नवी दिल्ली : Yahoo ची कॉरपोरेट आइडेंटिटी आता बदलणार आहे. कंपनीने याहू हे नाव बदलून नवं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता कंपनीचं नाव Altaba Inc होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर ४.८ अरब डॉलरची वेराइजन डील झाली तक कंपनीच्या बोर्डची संख्या देखील अर्धी कमी होणार आहे. याहू आपल्या डिजीटल सर्विसेज, वेराइजन कम्‍युनिकेशनला विकणार आहे. यामुळे इमेल, वेबसाइट, मोबाईल अॅप आणि डवर्टाइजिंग टूल्‍स वेराइजनला मिळणार आहे.  


या डीलशी संबधिती एका व्यक्तीने सांगितलं आहे की, नवं नाव हे alternative आणि Alibaba चं कॉम्बिनेशन आहे. याहूचे १० बोर्ड सदस्य आहेत. सीईओ मेरिसा मेयरसह ४ डायरेक्‍टर आहेत. वेराइजन डीलनंतर हे सगळे राजीनामा देणार आहेत. काही दिवसांपूर्वीच  याहू अकाउंट्सच्या हॅ‍किंगचे दोन वेगवेघळ्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर ही डील अडचणीत आली होती. या हँकींगमध्ये १ अरबहून अधिक यूजर्सचे पर्सनल अकाऊंट हॅक झाले होते.