YAHOO मेसेंजर होणार बंद!
सगळ्यात जुन्या मॅसेंजर पैकी एक म्हणजे याहू मॅसेंजर. १९९८ साली याहू पेजर या नावाने सुरु झालेल्या याहू मॅसेंजरचा प्रवास आता संपल्यात जमा आहे. एके काळी लोकप्रिय असलेल्या या मॅसेंजरने स्वत:ची चॅट रूम तसेच वेगवेगळे स्माईली यांमुळे तरूणांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
मुंबई : सगळ्यात जुन्या मॅसेंजर पैकी एक म्हणजे याहू मॅसेंजर. १९९८ साली याहू पेजर या नावाने सुरु झालेल्या याहू मॅसेंजरचा प्रवास आता संपल्यात जमा आहे. एके काळी लोकप्रिय असलेल्या या मॅसेंजरने स्वत:ची चॅट रूम तसेच वेगवेगळे स्माईली यांमुळे तरूणांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
का बंद होतय याहू मेसेंजर ?
जसजसा काळ बदलत गेला तशी स्पर्धा वाढत गेली. ऑर्कूट, जी टॉल्क, फेसबुक मॅसेंजर ,व्हॉट्सअॅप, यांसारख्या मॅसेंजरच्या स्पर्धेत याहू मॅसेंजर मागे पडू लागले. त्यामुळे याहू मॅसेंजरचे अनेक युझर्स इतर मॅसेंजरकडे शिफ्ट झाले.
यावर उपाय म्हणून याहू मॅसेंजरने अनेक बदल घडवत नवीन याहू मॅसेंजर २०१५ साली लाँच केले. हे नवीन याहू मॅसेंजर गुगल प्ले तसेच अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.
१८ वर्ष जुने याहू मॅसेंजर आता बंद करून त्याजागी नवीन याहू मॅसेंजर सुधारित फिचर्ससह आणणार आहे. त्यासाठी याहूने युझर्सना ०५ ऑगस्ट २०१६ पर्यंत नवीन याहू मॅसेंजर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. जर जुने मॅसेजेस हवे असतील तर ते युझर्सनी ५ ऑगस्ट आधीच घ्यावे एकदा जुने मॅसेंजर बंद केले तर मात्र जुन्या मॅसेंजेसना अॅक्सेस मिळणार नाही.