मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याचे तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे भाषण गाजले होते. त्याने दिलेल्या 'आझादी'च्या नाऱ्यांची तरुणाईत चर्चा होती. तर त्याच्या विरोधकांनी मात्र त्याच्यावर टीका केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटन क्षेत्रातील एक कंपनी असणाऱ्या 'यात्रा डॉट कॉ़म'ने आता त्यांच्या नव्या मोबाईल अॅपच्या प्रसिद्धीसाठी तयार केलेल्या एका जाहिरातीसाठी कन्हैया कुमारच्या याच भाषणाचे विडंबन केले आहे. हे अॅप तुम्हाला विमानात खिडकीनजीकची जागा मिळवून देण्याची 'आझादी' देईल, तसेच रांगेत उभं राहण्यापासूनही 'आझादी' देईल असे आणि अनेक संदर्भ या जाहिरातीत देण्यात आले आहेत. 


सध्या ही जाहिरात इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल झालीये. कन्हैयाकडून अद्याप तरी या जाहिरातीवर काही प्रतिक्रिया आलेली नाही.