मुंबई : अनेक वेळा तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी अडचणी येतात, तुम्ही शहरापासून दूर आहात, जेथे चार्जिंगची सोय नाही, किंवा तुमच्याकडे चार्जर नसेल तर फोन चार्जिंग करण्यास अडचणी येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॅपटॉप सुरू करून तुम्ही फोन चार्ज केल्यास, तुमच्या लॅपटॉपची बॅटरी जलद गतीने डिस्चार्ज होते. मात्र एक पर्याय असा देखील आहे की, जर तुमचा लॅपटॉप बंद असेल तरीही त्याच्या मदतीने तुमचा फोन तुम्ही चार्ज करू शकतात. यामुळे लॅपटॉपची बॅटरी लवकर संपणार नाही आणि तुमच्या फोनची बॅटरीही चार्ज होणार आहे.


समजून घ्या, बंद लॅपटॉपने मोबाईल बॅटरी कशी चार्ज होते...


विंडोज सेव्हन किंवा त्यानंतरच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या कम्प्युटरवर 'माय कम्प्युटर'वर क्लिक करा, आणि त्यानंतर 'प्रॉपर्टीज'मध्ये जाऊन 'डिव्हाईस  मॅनेजर' निवडा, त्यावर क्लिक करा.


यानंतर युनिव्हर्सल सीरियल बस कंट्रोलर दिसेल, यावर क्लिक करून यूएसबी रूट हब लिहिलेलं दिसेल. यूएसबी रूट हबच्या प्रॉपर्टीजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पावर मॅनेजमेंट टॅब दिसेल, यावर अलाऊ कम्प्युटर टू टर्न ऑफ थिस डिव्हाइस टू सेव्ह पावर लिहिलेलं दिसेल. यासोबतच्या बॉक्सवरील टिक मार्क काढून टाका.


यानंतर तुम्ही लॅपटॉप मोबाईल बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरा, तुमचा लॅपटॉप बंद असेल तरीही तुमची मोबाईल बॅटरी चार्ज होईल.
यानुसार वीज बंद असल्यावरही तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकतात. मात्र या गोष्टीकडे लक्ष द्या की, तुमच्या लॅपटॉपची बॅटरी कमीत कमी वापरून तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकतात.