मुंबई : तुम्ही एकटे एकावेळेस किती पाणीपुरी खाऊ शकता...तुम्ही पाणीपुरीचे खरे शौकीन असाल तर येथे तुमच्यासारख्या पाणीपुरीच्या चाहत्यांसाठी एक चॅलेंज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातच्या पोरबंदरमधील एक पाणीपुरीवाल्याकडे तुम्ही एकावेळेस हव्या तितक्या पाणीपुरी खाऊ शकता. जिओने अनलिमिटेड डेटाचा प्लान लाँच कोला होता. या प्लानवरुन प्रेरणा घेतानाच त्याने ही नवी स्कीम आपल्या गाडीवर सुरु केलीये.


रवी जामडा असं या तरुणाचे नाव आहे. पाणीपुरी खाणाऱ्या शौकीनांसाठीच्या या स्कीम्स तर भन्नाटच आहे. १०० रुपयांत एका व्यक्तीसाठी अनलिमिटेड पाणीपुरी तर १००० रुपयांत एक व्यक्ती महिनाभर अनलिमिटेड पाणीपुरी खाऊ शकते. त्याच्या या अजब स्कीमने रवीच्या दुकानावर मोठी गर्दी होऊ लागलीये.