Gautami Patil Dance Show in Nashik: सबसे कातील, गौतमी पाटील...  महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटीलचा (Gautami Patil)कार्यक्रम म्हटल की राडा झालाच पाहिजे. गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमातला राडा तसा महाराष्ट्रासाठी नवीन नाही. मात्र तिच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी वाढू लागली. नाशिक येथे गौतमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी एकच गोंधळ घातला.  हुल्लडबाजांनी  मीडियावर हल्ला केला. या मारहाणीत अनेक जण जखमी झाले आहेत.


मीडियाचे फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांच्यावर हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतमी पाटीलच्या नाशिकमधील कार्यक्रमात जोरदार राडा झाला. यावेळी मीडियाचे फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांच्यावर काही दारुड्या हुल्लडबाजांनी हल्ला केला. या मारहाणीत काहीजण जखमी झाले. पोलिसांनी कसाबसा या धिंगाणा घालणा-या तरुणांना आवर घातला. धक्कादायक बाब म्हणजे या हुल्लडबाजीनंतरही गौतमीचा डान्स शो सुरूच होता.


गौतमीचा नाद करेल जीवाचा घात 


सबसे कातील, गौतमी पाटील...असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या तरूणाईला घायाळ करणा-या गौतमीचा नाद आता जीवावर बेततो की काय, असच वाटू लागल. कारण गौतमीची एक झलक पाहण्यासाठी कुणी झाडावर चढत आहे. तर, कुणी छतावर चढून गौतमीचा डान्स पाहत आहे. 


पत्र्यांच्या शेडवर चढले आणि जखमी झाले


वैजापूरच्या महालगाव येथे गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक एका दुकानातील पत्र्यांच्या शेडवर चढले होते. गर्दी इतकी वाढली की ही शेडच कोसळली. या गोंधळात 8 ते 10 लोक जखमी झाले होते. 


गौतमीचा डान्स सुरू असताना प्रेक्षकांचा धुडगूस


खेड तालुक्यातील बहिरवाडी इथं गौतमीचा डान्स सुरू असताना प्रेक्षकांनी धुडगूस घातला होता. अखेर या हुल्लडबाजांना रोखण्यासाठी गावातील महिलांनाच हातात दांडुक घ्यावं लागलं. 


अहमदनरमध्ये लाठीमार


अहमदनरच्या श्रींगोद्यातही गौतमीच्या चाहत्यांनी असाच धुडगूस घातला. त्यावेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला. 


गाळ्यांवर चढले आणि पत्रे तुटले


पारनेर तालुक्यातल्या जवळे गावात गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक ग्रामपंचायतीनं बांधलेल्या गाळ्यांवर चढले, आणि अवघ्या काही क्षणात हे पत्रे तुटले.
नगरच्या राहत्यात तर कहरच झाला
नगरच्या राहत्यात तर कहरच झाला. गौतमीनं डान्स थांबवल्यानं प्रेक्षकांनी एकच गोंधळ केला. हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला. अतिउत्साही प्रेक्षकांना आवरताना 60 बाऊन्सरसह आयोजकांची दमछाक झाली.