नाशिक: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच लासलगाव मतदारसंघात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी भुजबळांनी अडीच वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी भुजबळांनी अधिकाऱ्यांना काम करण्याच्या सूचनाही केल्या. मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर पालिकेच्या सदस्यांनी येणाऱ्या विविध अडचणी समजून घेत त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.