जळगाव : राज्यात डोंबिवली, पुणे आणि अन्य ठिकाणच्या महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना जळगावातूनही धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावात एकतर्फी प्रेमातून तरुणाने अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात अडवून अश्लिल कृत्य केलं. एवढंच नव्हे तर तरुणाने तिला तेथेच जिवे मारण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलदीप सपकाळे नावाच्या आरोपीने अल्पवयीन मुलीची छेड काढली. 17 वर्षीय मुलीवर आरोपी कुलदीपचे एकतर्फी प्रेम होते. म्हणुन तो गेल्या काही दिवसांपासून तिचा पाठलाग करीत असे. 


पीडित मुलगी गुरूवारी (28 ऑक्टोबर) रोजी आपल्या मैत्रिणीसह बाजारात गेली होती. त्यावेळी अग्रवाल चौकात कुलदीपने पीडितेला अडवले. 'तू फक्त माझी आहेस, आणि तू माझी नाही झालीस तर, मी तुला जिवंत ठेवणार नाही' अशी थेट धमकी कुलदीपने पीडितेला दिली. 


यावेळी कुलदीपने भर चौकात पीडितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिला व तिच्या मैत्रिणीला शिवीगाळ केली. यासंबधीची तक्रार पीडितीने पोलिसांत केल्यानंतर, जळगाव पोलिसांनी तत्काळ दखल घेत गुन्हा नोंदवला आहे.