जळगाव: आपल्याला बदनाम करणारी एक फळीचं राज्यात कार्यरत आहे. मुंबई उच्च न्यायालयात देखील बनावट कगदपत्रांच्या आधारे आपल्यावर उलटसुलट आरोप करण्यात आले, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडवरून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे खडसेंच्या चौकशीची मागणी करणारे पत्र पाठवण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघड झाला होता. मात्र, भोळेंनी आपल्या लेटरहेडचा परस्पर वापर करण्यात आल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर खडसेंनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, न्यायाधीशांना बनावट पत्र देऊन मला बदनाम करण्यामागे कोण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. खडसेंच्या या विधानाचा रोख अप्रत्यक्षपणे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे होता. त्यामुळे आता अंजली दमानिया काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.