निलेश वाघ, झी २४ तास, जळगाव: जळगावसह खानदेश परिसरासाठी  वरदान ठरलेल्या  गिरणा धरण अखेर १२ वर्षांनी संपूर्णपणे भरले आहे. सध्या धरणाच्या दोन दरवाजांमधून गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिरणा हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. तब्बल १२ वर्षांनी हे धरण भरल्याने या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.  


धरणाचे उगमस्थान असलेल्या कळवण, सुरगाणा व सटाणा  परिसरात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. याशिवाय, चनकापुर ,पुनद धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे गिरणा धरणाच्या पातळीतही कमालीची वाढ झाली आहे.


गिरणा धरण पूर्ण भरल्याने जळगाव जिल्ह्यातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. गेल्यावर्षी गिरणा धरण अवघे ४९ टक्के भरले होते. यंदा मात्र सप्टेंबरमध्ये धरण पूर्णपणे भरले आहे.