नंदुरबार: अतिवृष्टीनंतर नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये मोठे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यातल्या खोकसा पाझर तलावाला मोठी गळती लागलीय. असे घडल्यास पूर्ण गाव वाहून जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दोन वर्षांपासून या तलावाला गळती लागली आहे . मात्र, या पावसाळ्यात या गळतीचे धबधब्यात रुपांतर झाले आहे. विशेष म्हणजे २०१४ मध्ये म्हणजे केवळ चार वर्षांपूर्वी हा पाझर तलाव बांधण्यात आला होता. 
 
 
 सूरत-नागपूर महामार्गावरील वाहतूक बंद
 
 नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सूरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक बंद करण्यात आली. महामार्गावरील जुना पूल खचल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला. सुरतवरून येणारी वाहतुक विसरवाडी नंदुरबारमार्गे वळवलीय. वाहतूक विस्कळीत झाल्याने महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.. तुटलेल्या पुलावर भराव टाकण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून एक दिवसाचा अवधी लागले अशी माहिती पोलिसांनी दिली. 
 
 
 शेतकरी आनंदित
 सुमारे २० ते २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्यात. मात्र असं असतानाच दुसरीकडे मुसळधार पावसानं अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसब्यातील डोबानपुरा भागात अति पावसामुळे घराची भिंत कोसळल्याचं पाहून ६२ वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. शामराव शेकोकार असं मृतक शेतकऱ्याचं नाव आहे.