वाल्मिक जोशी, जळगाव : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु डेल्टा प्लस व्हेरिएंटने आता डोके वर काढले आहे. या विषाणूचे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. यापार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा निर्बंध लागू केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्ह्यात डेल्टा आणि डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यात रुग्णवाढ होऊ नये म्हणून प्रशासनाने पुन्हा निर्बंध वाढवण्यास सुरूवात केली आहे. 


  • जिल्ह्यात सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या कालावधीत मेडिकल एमर्जन्सी तसेच अत्यावश्यक सेवेतील सरकारी, निमसरकारी व्यक्तींनी संचारास परवानगी राहिल. 

  • अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने दुपारी 4 पर्यंत आणि शनिवार रविवार बंद राहतील.

  • शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह बंदच राहतील

  • हॉटेल, रेस्टॉरंट, बारला दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी परंतु 4 वाजेनंतर पार्सल सुविधा रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल

  • सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम 2 तासात 50 टक्के क्षमतेने करता येतील.

  • लग्न समारंभ 50 लोकांच्या तर अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यात यावेत.

  • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस सर्व बंदच राहतील.

  • जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा पुर्ण क्षमतेने सुरू राहिल.