नाशिक: शिवसेनेची पदाधिकारी असलेल्या लक्ष्मी ताठे नावाच्या महिला गांजा तस्कराला नाशिक पोलिसांनी गजाआड केलंय. लक्ष्मी ताठे ही शिवसेनेची पदाधिकारी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरात गांजा नेटवर्कची प्रमुख म्हणून लक्ष्मी ताठे ओळखली जात होती. देशभरात सुरू असलेल्या गांजा तस्करीत ती महत्त्वाची भूमिका निभावत होती.


पोलीस कारवाईची कुणकुण लागल्यावर ती पंधरवड्यापासून फरार होती. एक दिवसापेक्षा अधिक काळ ती कुठेही मुक्काम करत नव्हती. पोलीस सतत तिच्या मागावर होते. अखेर नाशिक पोलिसांनी लक्ष्मी ताठेला बेड्या ठोकण्यात यश मिळाले.