कोलकत्ता : फिफा अंडर १७ वर्डकपची फायनल मॅच २८ ऑक्टोबरला होणार आहे. या फायनल मॅचची तिकिटे काही फुटबॉल प्रेमींना मिळाली नसतील तर नाराज होऊ नका. कारण ६ ऑक्टोबरपासून तिकीट विक्री पुन्हा सुरु होणार आहे. तर फुटबॉल प्रेमींना तिकीट खरेदीची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे.  ६ ऑक्टोबरपासून टुर्नामेंटला देखील सुरुवात होईल. 
साल्ट लेक स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याचे जवळचे तिकीट ३५००० आहे. अधिकतर तिकिटे आधीच विकली गेली आहेत. फिफाच्या स्थानिक आयोजन समितीचे परियोजना निर्देशक जाय भट्टाचार्य यांनी सांगितले की, काही तिकिटे अजून देखील शिल्लक आहेत. ती आता विकली जातील. तसंच भट्टाचार्य म्हणाले की, पहिल्या तीन भागात तिकीट विक्री झाली याचा अर्थ असा नाही की, तिकिटे शिल्लक नाहीत. त्याचबरोबर प्री क्वार्टर फाइनल आणि क्वार्टर फाइनलची तिकिटे देखील शिल्लक आहेत.