Mumbai Marathon 2023 : रन मुंबई, दोन वर्षांनंतर18 वी मॅरेथॉन स्पर्धा
Mumbai Marathon : दोन वर्षांनंतर मुंबईत 18 व्या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. (Mumbai Marathon News) स्पर्धेत 55 हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग घेतला आहे. विविध 7 गटात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले.
Mumbai Marathon 2023 : दोन वर्षांनंतर मुंबईत 18 व्या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. (Mumbai Marathon News) स्पर्धेत 55 हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग घेतला आहे. विविध 7 गटात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. फुल आणि हाफ अशा दोन्ही मॅरेथॉनचा मार्ग हा वांद्रे-वरळी सीलिंक, महालक्ष्मी रेसकोर्स, हाजी अली, पेडर रोड, बाबुलनाथ मंदिर, चौपाटी आणि आझाद मैदानच्या शेजारील असेल. (Mumbai Marathon News in Marathi ) या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित आहेत. पूर्ण मॅरेथान महिला आणि पुरुष विजेत्याला प्रत्येकी 5 लाख रुपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे.
मॅरेथॉनसाठी वाहतुकीच्या नियोजनबरोबरच मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दक्षिण, मध्य आणि पोलिसांच्या पश्चिम विभागातील स्थानिक पोलिसांबरोबरच 540 अधिकारी, 3145 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलिसांच्या 18 तुकड्या, चार दंगल पथके, 18 जलद गती दलाची पथके, वाहतूक पोलिस, वॉर्डन तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथके असा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मॅरेथॉनच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, दहा किलोमीटर धाव, ड्रीम रन, सीनिअर सिटीझन्स रन आणि चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन आदी विभागांमध्ये हजारो धावपटू ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दक्षिण मुंबईतील विविध महत्त्वपूर्ण इमारतींच्या सहवासात धाव घेतील. पूर्ण मॅरेथॉनचा मार्ग शहराच्या मध्यभागातून जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून तो सुरू होईल, तर अर्ध मॅरेथॉन ही माहीम रेती बंदरहून सुरु झाली आहे. 'मुंबई मॅरेथॉन'चे यंदा 18 वे वर्ष आहे. यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये 55 हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत.
मुंबईत 18 व्या मॅरेथॉन स्पर्धा : विविध 7 गटात मुंबई मॅरेथॉनचे आयोजन (18th Marathon in Mumbai )
पहिला गट - 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन, हौशी गट
दुसरा गट - 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन, व्यावसायिक खेळाडू
तिसरा गट - 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन
चौथा गट - 10 किलोमीटर
पाचवा गट - दिव्यांग गट दीड किलोमीटर (1.3)
सहावा गट - सिनिअर सिटीझन चार किलोमीटर (4.2)
सातवा गट - ड्रीम रन 6 किलोमीटर (5.9)
आणि
Full Marathon (हौशी गट)
Full Marathon Elite (व्यावसायिक खेळाडू )