Mukesh Ambani Wife Nita Viral Photos: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका तसेच अध्यक्षा नीता अंबानी यांनी मुंबईमधील आपल्या निवासस्थानी एका खास पाहुण्याचं स्वागत केलं. या स्वागताचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. नीता अंबानी यांनी स्वत: अॅटीलियाच्या प्रवेशद्वारावर औक्षण करुन या व्यक्तीला घरात घेतलं. मात्र हे फोटो व्हायरल झाल्यानंतर ही व्यक्ती आहे तरी कोण जिला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पत्नीने एवढ्या आपुलकीने आणि पारंपारिक पद्धतीने औक्षण करुन घरात घेतलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


सोशल मीडियावर हे फोटो चर्चेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर नीता अंबानी पाश्चिमात्य पेरहावात असलेल्या एका व्यक्तीचं औक्षण करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये नीता अंबानी या व्यक्तीचं औक्षण करत असताना मागील बाजूस श्री कृष्णाची मुर्ती दिसत आहे. आता नीता अंबानी कोणाचं औक्षण करत आहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर फोटोत दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे थॉमस बाच! अंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष असलेले थॉमस बाच यांचं स्वागत नीता अंबानी यांनी केलं. थॉमस हे 15 ते 17 ऑक्टोबरदरम्यान मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत आयओसीची 141 वी बैठक पार पडत असून त्यासाठीच थॉमस बाच आले आहेत. भारतामध्ये होणारी आयओसीची बैठक अनेक अर्थांनी खास आहे. तब्बल 40 वर्षानंतर भारतामध्ये ही बैठक पार पडत आहे. ही बैठक मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडणार असून त्यासाठी शहरात आलेल्या आयओसीच्या प्रमुखांचा पाहुणचार अंबानींनी केला. लाल रंगाची साडी, केसात गजरा अशा पारंपारिक लूकमध्ये नीता अंबानी दिसत आहेत.  



नीता अंबानींचं या सर्वाशी कनेक्शन काय?


नीता अंबानी यांनी अगदी कपाळावर टीळा लावून, औक्षण करत थॉमस बाच यांचं स्वागत केलं. नीता अंबानी या अंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या सदस्या असून त्यांच्या प्रयत्नांनीच भारताला या बैठकीचं आयोजन करण्याची संधी मिळाल्याचं सांगितलं जातं. मुंबईमध्ये 2023 साली ही बैठक घेतली जावी यासंदर्भातील प्रस्ताव 139 व्या बैठकीमध्ये नीता अंबानींच्या अध्यक्षतेखाली, भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष डॉ. नरिंद्र बत्रा, केंद्रीय खेळ मंत्री अनुराग ठाकूर आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाद अभिनव बिंद्रा यांच्या टीमने मांडला होता. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. एका फोटोमध्ये थॉमस बाच हे मुकेश अंबानी आणि नीता अंबानींबरोबरही दिसत आहेत.



रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून ऑलिम्पिक तसेच खेळांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृकता निर्माण करण्याचं काम करत आहेत. 2028 च्या ऑलम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतामध्ये आयोजित केली जाणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.