`गुलाबी साडी आणि...` ऑलिम्पिकमध्ये नीता अंबानी यांचा डान्स व्हायरल, सर्वांना नाचवले!
Nita Ambani Bhangra Dance: नीता अंबानी यांनी केलेला भांगडा सोशल मीडियात सध्या चर्चेत आहे.
Nita Ambani Bhangra Dance: पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आपले पहिले पदक जिंकून चांगली सुरुवात केली आहे.26 जुलैपासून भारताच्या पव्हेलियनच्या उद्घाटनाने या मेगा स्पोर्ट्स टुर्नामेंटची सुरुवात झाली.याला 'इंडिया हाऊस' असे नाव देण्यात आले आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून 'इंडिया हाऊस' सादर करण्यात आले असून याच्या उद्घाटनाला मुकेश अंबानी आणि नीता अंबानी दोघे उपस्थित होते. या दिवशीचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. जो सध्या सोशल मीडियात खूप ट्रेण्ड होतोय. जिथे नीता अंबानी इतर दर्शकांसोबत भांगडा करताना दिसतायत.
पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीता अंबानींचा भांगडा
इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ज्यामध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख आणि संस्थापक नीता अंबानी 'गल बन गई' आणि 'देवा श्री गणेशा' या प्रसिद्ध गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. नीता अंबानींना पाहुण्यांनी घेरलंय. त्यांच्यामध्ये राहुनही त्या बेधुंद होऊन डान्स करताना दिसत आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी नीता अंबानी यांना आमंत्रित करण्यात आले होते. पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीता अंबानी बेधुंद नाचतानाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत नीता अंबानी पिंक साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीता अंबांनींचे भाषण
नीता अंबानी या खेळ प्रशासक आणि आयओसी सदस्यदेखील आहेत.ऑलिम्पिकमध्ये भारत खूप चांगले प्रदर्शन करतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. आमच्या अॅथलिट्समध्ये 46 टक्के मुली आहेत. कोणी कोणापेक्षा कमी नाही. फक्त आपला आपल्यावर विश्वास असायला पाहिजे अशी शिकवण या सर्व महिला शक्तींकडून आमच्या तरुण, तरुणींना मिळतेय, असे त्या म्हणाल्या.
पाहा व्हिडीओ
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहास
मनू भाकरने पॅरीस ऑलिम्पिक 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंटमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकून इतिहास रचलाय. या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं मेडल आहे. मनूचे हे दुसरे ऑलिम्पिक आहे. 2020 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्यात तिला यश आलं नव्हतं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मनूचे पिस्टल खराब झाले होते. मनुने कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल्स जिंकले आहेत. यानंतर हरियाणा सरकारने तिला 2 कोटी रुपये दिले होते. 2017 च्या राष्ट्रीय शूटींग चॅम्पियन्सशिपमध्ये तिने ऑलिम्पियन आणि माजी वर्ल्ड नंबर 1 असलेल्या हीना सिद्धूचा रेकॉर्ड तोडला होता. रिपोर्टनुसार, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी मनू भाकरवर केंद्र सरकारने 1.7 कोटी रुपये खर्च केले होते. सुरुवातीच्या काळात मनू भाकर हिच्याकडे पिस्टलदेखील नव्हते. शूटींग व्यतिरिक्त मनू भाकरने बॉक्सिंग, किक बॉक्सिंग आणि क्रिकेट सारख्या इतर खेळांमध्येही नशिब आजमावले आहे. तिला मार्शल आर्टदेखील येते.
मनू भाकरविषयी...
22 वर्षीय मनू भाकर हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावची रहिवाशी आहे. तिची आई शाळेत शिकवते तर वडील मरिन इंजिनीअर आहेत. मनुने झज्जर विद्यापीठ पब्लिक स्कूलमधून सिनिअर सेकेंडरीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्समधून पदवी पूर्ण करतेय. विविध मीडिया रिपोर्टनुसार मनू भाकरचे नेटवर्थ 12 कोटी रुपये इतके आहे. तिच्याकडे असलेली संपत्तीची रक्कम ही स्पॉन्सर्सकडून मिळालेली आहे.