फक्त Messi नाही तर Google ने देखील मोडला 25 वर्षांचा रेकॉर्ड; Sundar Pichai म्हणतात...
Google highest ever traffic in 25 years: अर्जेटिनाने 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपूर्ण विश्व जणू `मेस्सी`मय झालंय. मेस्सीबरोबरच गुगलने रेकॉर्ड मोडला आहे.
FIFA World Cup: अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात (Argentina vs France Final 2022) खेळल्या गेलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या थरारक फायनल सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) फ्रान्सचा 4-2 ने पराभव केला. लाडका मेस्सी वर्ल्ड कप जिंकावा यासाठी चाहते प्रार्थना देखील करत होते. अखेर मेस्सीने मॅजिकल कामिगिरी करत अर्जेंटिनाला 36 वर्षानंतर वर्ल्ड कप (Argentina left fifa world cup) जिंकवून दिला आणि अनेक विक्रम नावावर केले. रविवारच्या रात्री फक्त मेस्सीच नाही तर गुगलने (Google) देखील विक्रम मोडला आहे. (Search recorded its highest ever traffic in 25 years during the final of FIFA World Cup said google ceo Sundar Pichai marathi news)
फिफा वर्ल्ड कपची क्रेझ जगभरात पहायला मिळाली. अनेकांना या सामन्याबद्दल उत्सुकात असल्याने गुगलवर (Google Search) देखील मोठ्या प्रमाणात सामन्याबद्दल सर्च सुरू होते. गुगलने अंतिम सामन्यात 25 वर्षे जुना विक्रम (Google Break Record) मोडीस काढला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google ceo Sundar Pichai) यांनी सोमवारी सकाळी ट्विट करत याची माहिती दिली.
काय म्हणाले सुंदर पिचाई?
अर्जेंटिना आणि फ्रान्स (argentina vs France) यांच्यातील फिफा विश्वचषक फायनल दरम्यान गेल्या 25 वर्षात गुगल सर्चने सर्वाधिक ट्रॅफिक नोंदवलं आहे. जणू काही संपूर्ण जग त्याच गोष्टीचा शोध घेत आहे, असं ट्विट सुंदर पिचाई (Sundar Pichai Tweet) यांनी केलंय.
पाहा ट्विट -
दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात 135 मिनिटाच्या खेळात हृदयाचे ठोके क्षणाक्षणाला वाढत होते. इमिलियानो मार्टिनेसने अंतिम गोल करत मेस्सीच्या (Lionel Messi) फॅन्सच्या आशा जिवंत ठेवल्या आणि 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपूर्ण विश्व जणू 'मेस्सी'मय झालंय.