PHOTO : 99.9% लोकांना माहित नाही व्हिस्कीमध्ये किती पाणी मिसळावं; चव वाढविण्यासाठी योग्य प्रमाण काय?

Sun, 25 Feb 2024-2:54 pm,

देशातील आणि जगातील बहुतेक मद्यप्रेमी व्हिस्की ही पाण्यात, सोडा, कोल्ड्रिंक, ज्यूस किंवा बर्फात मिक्स करुन घेतात. पण नेमकं किती प्रमाणात व्हिस्कीमध्ये पाणी मिक्स केल्यास त्याची चव वाढते हे मद्यप्रेमींना माहिती नाही. 

 

प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार हवं तेवढं पाणी व्हिस्कीमध्ये मिक्स करतात. तर काही लोक हे ऑन द रॉक्स पितात. तरीही 99.90 टक्के लोकांना व्हिस्कीची चव वाढविण्यासाठी नेमकं किती पाणी मिक्स करावं हे माहिती नाही. 

 

तज्ज्ञांच्या मतं, व्हिस्कीची मूळ चव टिकवून ठेवण्यासाठी नेमकं किती पाणी घालावे याबद्दल मद्यप्रेमींना माहिती नसतं. त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी एक संशोधन करण्यात आलं. 2023 मध्ये वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी आणि ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे अन्न शास्त्रज्ञ यांनी हा अभ्यास केला. टीमने व्हिस्की आणि पाण्याचा वेगवेगळ्या प्रमाणात अभ्यास करण्यात आला. 

 

फूड्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असं म्हटलंय की, टीमने बोर्बन, राई, सिंगल-माल्ट, मिश्रित स्कॉच आणि आयरिश व्हिस्कीसह 25 वेगवेगळ्या व्हिस्कीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासासाठी अत्यंत अनुभवी व्हिस्की चाखणाऱ्यांच्या पॅनेलने परीक्षण केलं. शास्त्रज्ञांनी 100 टक्के व्हिस्की, 90 टक्के व्हिस्कीत 10 टक्के पाण्यात, 80 टक्के व्हिस्की 20 टक्के पाण्यात, 70 टक्के व्हिस्की 30 टक्के पाण्यात, 60 टक्के व्हिस्की 40 टक्के पाण्यात आणि 50 टक्के व्हिस्की 50 टक्के पाण्यात मिसळून चाचणी करण्यात आली. 

 

या अभ्यासातून असं समोर आलं की, 80 टक्के व्हिस्की 20 टक्के पाण्यात मिसळल्यास उत्तम चव निर्माण होते. तसंच व्हिस्कीची ऑरिजनल चवही बदलत नाहीत. या अभ्यासातून ही सर्वोत्तम मिश्रण असल्याचं मान्य करण्यात आलं. ते म्हणाले की, नॉन-हायड्रोफिलिक रेणू जे पाण्यात चांगले मिसळत नाहीत ते काढून टाकले जातात त्यामुळे संतुलित चव मिळते. 

 

संशोधनानुसार, 20 टक्क्यांहून अधिक पाणी मिसळल्याने व्हिस्कीची अनोखी चव कमी होते. तर  90 टक्के आणि 10 टक्के पाण्याचे मिश्रण सर्वोत्तम नव्हते, असा दावा करण्यात आलाय. या अभ्यासानुसार दुहेरी पेगमध्ये म्हणजे 60 मिली व्हिस्कीमध्ये 12 मिली पेक्षा जास्त पाणी घालू नयेत.

 

अभ्यासानुसार 12 मिली पाणी व्हिस्कीची चव टिकवून ठेवली जाते. यापेक्षा जास्त पाणी घातल्याने व्हिस्की पातळ होते आणि त्याची चव योग्य नसते. यामुळे त्याची नैसर्गिक चव नष्ट होते.  (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)  

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link