अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील `या` 20 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट

Pravin Dabholkar Sat, 24 Feb 2024-7:15 pm,

Amrit Bharat Yojana: लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबई लोकलच्या 20 स्थानकांचा कायापालट होणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील 12 तर पश्चिम रेल्वेवरील 8 स्थानकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील 554  हून अधिक रेल्वेस्थानकामधील विविध विकासकामे तसेच 1500 रोड ओव्हर ब्रीज आणि भुयारी मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.

भारतीय रेल्वेच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानकांचे काम केले जाणार आहे.  4886 कोटींपेक्षा जास्त खर्च करून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. 66 पैकी 11 महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्रातील 11 स्थानकांपैकी मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी जोगेश्‍वरी, मालाड आणि पालघर या 8 उपनगरीय स्थानकांची पायाभरणी करण्याकरिता 233 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

तर मध्य रेल्वेच्यादेखील 12 स्थानकांचा विकास होणार आहे.  या बारा स्थानकांमध्ये सँडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, वडाळा रोड, इगतपुरी या स्थानकांच्या समावेश आहे. यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाला 260 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

या बारा स्थानकांमध्ये सर्वात जास्त निधी हा दिवा रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि पुनर्विकासासाठी देण्यात आला आहे.तर तब्बल 45 कोटी रुपये दिवा रेल्वे स्थानकाच्या कामासाठी देण्यात आले आहेत. 233 कोटी रुपये खर्च करून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. 

पश्चिम रेल्वेतील आठ स्थानकांपैकी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि आधुनिकीकरणासाठी 50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मलाड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 35 रुपये कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.  लोअर परेल रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 30 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.

मरीन लाईन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 28 कोटी रुपये देण्यात आला आहे. ग्रँड रोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 28 कोटी रुपये, चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 23 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. 

प्रभादेवीसाठी 21 कोटी आणि पालघर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास आणि पुनर्बांधणीसाठी 18 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. असे मिळून एकूण 233 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात पश्चिम रेल्वेतील 8 स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील 20 स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. यामध्ये मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी आणि मालाड स्थानकांवर बारा मीटर रुंद पायी ओव्हर ब्रिजसाठी तरतूद करण्यात आली आहे.

या कामासाठी 85.23 कोटी इतका खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. याचा खर्चदेखील 233 कोटी रुपयांमध्ये समाविष्ट आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील 8 आणि मध्य रेल्वे मार्गावरील 12 असे मिळून मुंबईतील एकूण 20 स्थानकांच्या पुनर्विकास होणार आहे.

या कामांमध्ये सुधारित टॉयलेट बॉक्स आणि ड्रेनेज सिस्टीम बसवणे, स्ट्रक्चरल दुरुस्ती आणि छतावरील पत्रांची दुरुस्ती करणे, तिकीट बुकिंग ऑफिस, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था आणि पार्किंग क्षेत्र तयार करणे या कामांची तरतूद आहे.

अमृत भारत योजनेंतर्गत या स्थानकांमध्ये 12 मीटर रुंदीचे पादचारी पूल बांधण्यात येतील. आधुनिक स्वरुपात नव्या रचनेसह स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन, आधुनिक बैठक व्यवस्था आहे.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेचे दिवे बसवले जाणार आहेत. रेल्वे स्थानकांमध्ये लिफ्ट आणि सरकत्या जिने देखील बसवले जाणार आहेत. रेल्वेच्या वेळा दर्शवण्यासाठी आधुनिक डिजीटल बोर्ड, तिकीटघरांचा विकास करण्यात येईल. हा विकास करताना दिव्यांगांचा देखील विचार केला जणार आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link