Anant Ambani Radhika Merchant Engagement : Cuteness Overload... राधिका मर्चंटचे बालपणीचे फोटो पाहून हेच म्हणाल

Mon, 23 Jan 2023-10:00 am,

राधिका आणि अनंतला अनेकांनीच शुभेच्छा दिल्या आणि त्यातल्या अनेकांनी अंबानी कुटुंबातील या नव्या सदस्याविषयी जाणून घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. 

राधिकाचे बरेच फोटोही यादरम्यान व्हायरल झाले. यामध्ये तिच्या बालपणीच्या फोटोंपासून महाविद्यालयीन दिवसांतील फोटोंचाही समावेश होता. तिचे हे फोटो पाहून, किती गोड आहे ही.... अशाच प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. 

 

गेल्या काही दिवसांपासून राधिकाच्या निरागस सौंदर्यानं सर्वांच्याच मनात घर केलं आहे. तिचं सुरेख हास्य अनेकांच्याच नजरा खिळवून ठेवत आहे. 

 

18 डिसेंबर 1994 ला जन्मलेली राधिका अनंतची बालमैत्रीण आहे. देशातील प्रमुख औषध कंपनी असणाऱ्या एनकोर हेल्थकेयर (Encore Healthcare)चे सीईओ वीरेन मर्चंट यांची ती लेक. 

स्विमिंग आणि डान्सिंगची आवड असणाऱ्या राधिकानं वेळोवेळी तिचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. 

 

तिच्या साखरपुड्याच्या लूकनं सर्वांनाच घायाळ केलं. त्यामुळं आता अंबानीं कुटुंबाची ही सून तिच्या लग्नासाठी कोणत्या आऊटफिटला पसंती देते यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link