Asia Cup: `नेपाळला जायला पासपोर्ट पण लागत नाही आणि तुला सारा पाहिजे?`

Swapnil Ghangale Tue, 05 Sep 2023-8:53 am,

आशिया चषक स्पर्धेत भारताने 'सुपर-4'मध्ये प्रवेश केला आहे. नेपाळविरुद्धचा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 10 गडी राखून जिंकला. या विजयासहीत आता  'सुपर-4'च्या फेरीमध्ये सामना भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. 

नेपाळच्या संघाने 230 धावांचा स्कोअर केल्यानंतर भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला अन् सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. मात्र नंतर सुरु झालेल्या सामन्यामध्ये भारताला 23 ओव्हमध्ये 147 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने दमदार फटकेबाजी करत सामना जिंकून दिला.

 

रोहित शर्माने 59 चेंडूंमध्ये 74 धावांची खेळी केली. त्याने 6 चौकार आणि 5 षटकार लगावले. तर शुभमन गिलने 62 चेंडूंमध्ये 67 धावांची खेळी केली. यामध्ये 8 चौकार आणि 1 षटकार होता. हा सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघ ट्रोल होत आहे. या ट्रोलिंगला निमित्त ठरत आहे लिंबू-टिंबू संघाविरुद्धच भारतीय फलंदाज चांगलं खेळतात हा दावा आणि सामन्यादरम्यान भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण पाहूयात असेच काही मिम्स...

तुलना यो-यो टेस्टमध्ये पहिले येणारे आणि वडापाव खाणाऱ्यांची... यामधून भारतीय क्षेत्ररक्षणावर टीका करताना विराटला प्रामुख्याने लक्ष्य केलं आहे.

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळताना आणि नेपाळविरुद्ध खेळतानाचा फरक

आमच्या किंगला एखादा चेंडू तरी खेळायला द्यायला हवा होता, असं विराटच्या चाहत्यांचं म्हणणं असेल असा दावा या मीममधून करण्यात आला आहे.

रोहित शर्मा छोट्या आणि दुबळ्या संघांविरोधातच खेळतो अशी टीका या मीममधून करण्यात आली आहे.

सोपे झेल सोडायचे अन् कठीण पकडायचे असा विराटचा कार्यक्रम आहे.

नेपाळने भारताला अशापद्धतीने विजय सोपवला.

नेपाळच्या संघाचं मनोगत म्हणत हे मीम शेअर करण्यात आलं आहे.

स्कोअरकार्ड पाहून विराट म्हणाला असेल एक बॉल तरी खेळू द्यायचा मला.

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध आणि नेपाळविरुद्ध...

सचिन आणि शुभमनमधील मजेदार चर्चा काय असेल असं या मीममधून दाखवण्यात आलं आहे. शुभमन केवळ दुबळ्या संघांविरोधात खेळतो असं यातून सूचित करण्याचा मानस दिसून येतो.

भारतीय संघ निवडताना आणि आयपीएलमधील गायक निवडताना बीसीसीआय कसा प्राधान्यक्रम देते ते पाहा असा टोला एकाने लगावला आहे.

शुभमन गील केवळ अहमदाबादच्या मैदानात आणि लहान संघाविरुद्ध फटकेबाजी करु शकतो असा दावा या मीममधून करण्यात आला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link