जिथं सलमान, शाहरुखला जागा मिळाली नाही त्या Most Influential People यादीत आलिया!

Thu, 18 Apr 2024-5:32 pm,

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आलिया भट्टला ओळखले जाते. तिने फक्त हिंदी सिनेसृष्टीत नव्हे तर हॉलिवूडमध्येही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आलिया भट्टने भारतासह  जगभरात अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

आलियाने 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती अनेक चित्रपटात झळकली.

दर्जेदार अभिनयाद्वारे कलाविश्वात स्वत:च भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या आलियाने एक मोठी मजल मारली आहे.

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रसिद्ध टाईम मासिकाने जगातील सर्वात प्रभावी 100 लोकांची यादी जाहीर केली आहे.

 

यात जगभरातील राष्ट्रप्रमुख, उद्योगपती, कलाकार, गायक, खेळाडू, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश असतो. या यादीत नाव येणं प्रचंड मोठा सन्मान मानला जातो. 

 

आता यंदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि कुस्तीपटू साक्षी मलिक यांच्या नावाचा समावेश आहे. आलियाने दीपिका पदुकोण, करीना कपूर यांना मागे टाकत हा किताब पटकावला आहे.  

आलियाला अभिनय क्षेत्रात तसेच लोककल्याण कार्यात दिलेल्या योगदानासाठी या यादीत स्थान मिळालं आहे.  

 

टाईम मासिकानं जाहीर केलेल्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये विश्व बँकचे अध्यक्ष अजय बंगा, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला, देव पटेल यांनाही स्थान मिळालं आहे. 

 

दरम्यान आलिया लवकरच वासन बालाच्या 'जिगरा' चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये वेदांग रैना देखील आहे. वायआरएफच्या ‘स्पायवर्स’ या चित्रपटातही ती प्रमुख अभिनेत्री असणार आहे. तसेच प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ यांच्यासह 'जी ले जरा' या चित्रपटातही ती झळकणार आहे.  

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link