बॉलिवूडच्या या कलाकारांनी केली कोरोनावर मात

Sun, 09 Aug 2020-3:12 pm,

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली होती. पण कोरोनावर मात करुन ते घरी परतले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्यासह मुलगा अभिषेक बच्चनने ही कोरोनावर मात केली होती. दोघेही नानावटी रुग्णालयात उपचार घेत होते.

बच्चन कुटुंबियातील आणखी २ सदस्य ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. पण त्यांनी ही कोरोनावर लवकर मात केली.

टीव्ही स्टार पार्थ समथानला देखील कोरोनाची लागण झाली होती. 'कसौटी जिंदगी के 2' या टीव्ही सीरियलच्या शूटिंगला त्यांनी सुरुवात केली आहे.

गायिका कनिका कपूरने देखील कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची लागण झालेली ती देशातील पहिली सेलिब्रिटी होती.

चित्रपट निर्माता करीम मोरानी यांना देखील कोरोना झाला होता. त्यांनीही कोरोनावर मात केली आहे.

करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानीने देखील कोरोनावर मात केली आहे.

करीम मोरानी यांची आणखी एक मुलगी जोया मोरानी हिने देखील कोरोनावर मात केली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link