Innova, Ertiga ला आता विसरा! लाँच झाली जबरदस्त 7 सीटर इलेक्ट्रिक SUV; 26 मिनिटात होणार फूल चार्ज, तब्बल 300KM रेंज

Fri, 21 Jun 2024-8:04 pm,

फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने अखेर आपली नवी इलेक्ट्रिक कार C3 Aircross EV ला युरोपियन मार्केटमध्ये लाँच केलं आहे. 

 

आकर्षक लूक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटर असणाऱ्या या 7 सीटर कारला कंपनीने पेट्रोल आणि हायब्रिड व्हेरियंटमध्येही सादर केलं आहे. दरम्यान कारच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटबद्दल जाणून घ्या.

 

नव्या C3 Aircross EV ला युरोपियन बाजारपेठेत 27,400 युरो (जवळपास 24.47 लाख रुपये) किंमतीत लाँच करण्यात आलं आहे. 

 

याच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 19,400 युरो (17.33 लाख) आणि हायब्रीड व्हेरियंटची किंमत 25,500 युरो (22.78 लाख रुपये) ठरवण्यात आली आहे. 

 

C3 Aircross च्या इलेक्ट्रिक व्हर्जनबद्दल बोलायचं गेल्यास त्याची लांबी 4.39 मीटर आहे. ही कार 5 आणि 7 सीटर अशा दोन कॉन्फिगरेशनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

 

बॉक्सी डिझाईन असणाऱ्या या एसयुव्हीत कंपनीने LED हेडलँप, रिअर पार्किंग सेन्सॉर कॅमेरा, हेड अप डिस्प्ले, 10.25 चा इंफोटेंमेंट सिस्टम आणि वायरलेस चार्जिगसारखे फिचर्स दिले आहेत. 

 

इलेक्ट्रिक एसयुव्हीत कंपनीने 44kWh क्षमतेचा लिथियम फॉस्फेट बॅटरी पॅक दिला आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 11BHP ची पॉवर जनरेट करते. 

 

कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक एसयुव्ही सिंगल चार्जमध्ये 300 किमीची रेंज देते. तसंच हिचा टॉप स्पीड ताशी 145 किमी आहे. 

 

C3 Aircross EV फास्ट चार्जर सिस्टमलाही सपोर्ट करते. या कारच्या बॅटरीला 100kW चार्जरच्या सहाय्याने फक्त 26 मिनिटात 20 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केलं जाऊ शकतं. 

 

सध्या कंपनीने कारला छोट्या बॅटरी पॅकमध्ये सादर केलं आहे. भविष्यात ही मोठ्या बॅटरी पॅकसह उपलब्ध होईल, जी 400 किमीची रेंज देईल.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link