ब्रिटीश PM सुनक यांच्या लंडनमधील घरी दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! दारात रांगोळ्या, समया, रोषणाई अन्...

Swapnil Ghangale Thu, 09 Nov 2023-8:26 am,

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली आहे. दिवाळीनिमित्त दिपप्रज्वलन करुन डाऊनिंग स्ट्रीटच्या निवासस्थानी या दोघांनी निमंत्रित पाहुण्यांसहीत दिवाळी साजरी केली.

सुनक आणि पत्नी अक्षता यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो @10DowningStreet या युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येनं पाहुणे डाऊनिंग स्ट्रीट 10 येथील घरी आले होते.

ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती दोघांनी पाहुण्याचं आदरातिथ्य केलं. अक्षता या भारतीय पेरहावामध्ये होत्या तर ऋषी यांनी ब्लेझर आणि फॉरमल कपडे परिधान केलेले.

"आज सायंकाळी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हिंदू समाजातील पाहुण्यांचं डाऊनिंग स्ट्रीटच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त स्वागत केलं. अंधकारावर मात करुन तोजोयम दिव्यांची आरास करण्याचा हा सण आहे," असं पंतप्रधान सुनक यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलं आहे.

डाऊनिंग स्ट्रीट 10 येथील घराबाहेर समया प्रज्वलित करण्यात आल्या होत्या.

डाऊनिंग स्ट्रीट 10 या ब्रिटीश पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर रांगोळीही काढण्यात आली होती.

वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत ब्रिटीश भारतीयांबरोबरच हिंदू समाजातील मान्यवरांना डाऊनिंग स्ट्रीट 10 येथील या दिवाळी सेलिब्रेशनसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.

अनेक आमंत्रित पाहुण्यांपैकी महिलांनी आवर्जून भारतीय पेहराव केल्याचं पाहायला मिळालं.

पाहुण्यांना डाऊनिंग स्ट्रीट 10 वरील ही भारतीय पद्धतीची तयारी पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अनेकांनी या रांगोळ्यांचे आणि डेकोरेशचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

फुलबाज्या आणि बिनआवाजाचे फटके फोडून डाऊनिंग स्ट्रीट 10 बाहेर दिवाळीचा जल्लोष साजरा करण्यात आला. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link