तुमची नजर कमकुवत झाली आहे का? `या` 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !

Wed, 05 Jul 2023-11:13 am,

आजकाल कमी वयातच चष्मा लागत आहे.  कारण डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्याचे हे लक्षण आहे. पोषक तत्वांची कमतरता हे अनुवांशिक कारण असू शकते. डोळ्यांच्या दृष्टी सुधारण्यासाठी तुम्ही लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करु शकता. 

Yoga For Weak Eye sight : पामिंग एक्सरसाईज केल्याने दृष्टी सुधारते. यामुळे डोळे रिलॅक्स राहतात. थकवा दूर होतो. पामिंग व्यायाम करण्यासाठी आपल्या दोन्ही हातांना एकमेकांवर घासा आणि काही वेळासाठी डोळ्यांवर ठेवा. 5 ते 7 वेळा हा उपाय केल्याने डोळ्यांचा थकवा दूर होण्यास मदत होईल.  

अनेक तास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. क्लॉकवाईज आणि एंटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये कमीत कमी  5 वेळा डोळे फिरवा. दिवसातून दोनवेळा हा उपाय केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळे चांगले राहतात.

पापण्या उघडझाप करा. त्यामुळे डोळ्यांवरील ताण  दूर होतो. दोन सेकंद डोळे बंद करा, नंतर उघडा आणि 5 सेकंद सतत ब्लिंक करा. हे किमान 5-7 वेळा पुन्हा करा. असे केल्याने डोळ्यांचा थकवा आणि लाल डोळ्यांची समस्या दूर होईल.

डोळे निरोगी ठेवण्याचा अतिशय सोपा आणि ट्रेंडी मार्ग म्हणजे 20-20-20 नियम. तुम्हाला फक्त लॅपटॉपवर काम करताना दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्यावा लागेल आणि तुमच्यापासून किमान 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहावे लागेल. या व्यायामामुळे दृष्टी चांगली होण्यास मदत होते.

डोळ्यांना दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच धुम्रपान, मद्यपान यांसारख्या हानिकारक सवयीही मर्यादित प्रमाणात सेवन कराव्यात. 

नेत्र तपासणीसाठी नियमितपणे डॉक्टरांकडे जा. लहान मुलांचे डोळे लवकर खराब होतात, अशा स्थितीत त्यांची नियमित नेत्र तपासणी करणे आवश्यक आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link