Mumbai Metro 3 : वर्षअखेरीस मेट्रो 3 चा आरे ते बीकेसी स्थानकादरम्यान पहिला टप्पा पूर्ण होणार!

Wed, 10 May 2023-1:17 pm,

मुंबई मेट्रोच्या माध्यमातून मुंबईतील वाहतूक कोंडी लवकरच कमी होणार आहे. सध्या मेट्रो 3 हा मार्ग जवळपास 90 टक्के काम झाले असून येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पहिला टप्पा (आरे ते बीकेसी) पूर्ण होईल. 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मेट्रो रेले कॉपोरेशनद्वारे तयार करण्यात येत असलेल्या मेट्रो 3 च्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी स्थानकाची पाहणी केली.  

मुंबई मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीची पर्यायी साधने उपलब्ध करून देण्यासाठी या रस्त्याचे काम सुरू आहे. 

 

त्यामुळे वाहतुकीचा ताण बऱ्याच अंशी कमी होणार असून मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

मेट्रो 3 मार्ग मेट्रो-1, 2,6 आणि 9 बरोबर मोनो रेल्वेशी ही जोडण्यात येणार आहे. याशिवाय उपनगरीय रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तसेच मुंबईतील विमानतळांशी जोडली जाणार आहे.

मेट्रो-3 रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ कमी होईल तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहनांची संख्याही कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. 

राज्याच्या विकासासाठी प्रकल्पांना दिरंगाई होणार नाही. आरेचा कारशेडचा विषय मार्गी लागा. मेट्रो रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.  

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link