PHOTO : इंडस्ट्रीत वर्णभेदाची शिकार, आज सर्वात फिटेस्ट सौंदर्यवती, रवीना आणि अक्षय कुमारचं नातं तुटण्यामागे `ही` अभिनेत्री ठरली कारण

Sat, 08 Jun 2024-2:07 pm,

अभिनेत्रीचा जन्म कर्नाटकातील मंगलोरमध्ये झाला. बॉलिवूडशी काही संबंध नसताना वयाच्या 17 व्या वर्षी इंडस्ट्रीत प्रवेश केला. 1992 मध्ये गाता रहे मेरा दिल हा चित्रपट साइन केला मात्र तो काही कारणामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. 

आम्ही बोलतोय शाहरुख खानची हिरोईन बाजीगरमधील शिल्पा शेट्टीबद्दल. 1993 मध्ये या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली होती. तर शिल्पाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 

त्यानंतर शिल्पाने आग, मैं खिलाडी तू अनारी, आओ प्यार करीन, हाथकडी, मिस्टर रोमियो, औजार, परदेसी बाबू, जानवर, धडकन यांसारखे अनेक चित्रपट केले. पण तिला बॉलिवूडमध्ये करिअर करणे सोपं नाही. एक वेळ अशी होती की, तिला काम मिळतं नव्हते. पण तिने हार मानली नाही. 

 वर्णभेदाचा सामना तिला करावा लागला. त्यानंतर तिने फिटनेसवर लक्ष दिलं. अभिनेत्रीचे अनेक फिटनेस व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग असतात. वयाच्या 49 व्या वर्षीही ती तरुण अभिनेत्रींना मागे टाकलंय. 

अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर तिने 2009 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रासोबत लग्न केलं. पण इथेही तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अश्लील चित्रपटानिर्मितीसाठी पैसे पुरवल्याचा आरोप झाले. त्यात कुंद्राला जेलवारी करावी लागली. 

मीडिया रिपोर्टनुसार असं म्हणतात की, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटादरम्यान जवळीक वाढली होती. त्यावेळी अक्षय आणि रविना डेट करत होते. या दोघांचा साखरपुडा झाला होता असंही म्हणतात. हे नातं शिल्पा शेट्टीमुळे तुटलं असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं जातं. 

शिल्पा शेट्टी हिनेदेखील महागडी सर्जरी केली आहे. पूर्वीची ती आणि आताची ती यात जमीन आसमानचा फरक झाला आहे. आज जरी ती चित्रपटापासून दूर असली तरी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे ती कायम चर्चेत असते. 

 मिड डेच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीवर नजर टाकली तर शिल्पा 134 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकीण आहे. अभिनेत्री अनेक हॉटेल्सची मालकही असून 2023 मध्ये तिने मुंबईतील कोहिनूर टॉवरमध्ये आणखी एक हॉटेल सुरु केलंय. याशिवाय शिल्पा SVS स्टुडिओची सह-संस्थापक आहे. तिने व्हीएफएक्स स्टुडिओमध्ये 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय. ती एका कपड्याच्या ब्रँडचीही मालकीणदेखील आहे. याशिवाय शिल्पा आणि राज कुंद्रा हे आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचे सहमालक आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link