शॉर्टकट म्हणून फ्रोजन वाटाणे वापरताय? `या` गंभीर आजारांचा धोका वाढेल

Mansi kshirsagar Fri, 15 Sep 2023-7:20 pm,

अलीकडे अनेक जण शॉर्टकट म्हणून फ्रोजन मटारचा वापर करतात. मात्र फ्रोजन मटारमध्ये पोषक तत्वे असतात त्यामुळं आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. फ्रोजन मटारमध्ये स्टार्जची मात्रा जास्त असते. त्यामुळं वजन वाढू शकते. या व्यतिरिक्त फ्रोजन मटारमध्येही ट्रान्स फॅटदेखील अधिक असते. ज्यामुळं हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. 

फ्रोजन मटार खाल्ल्यास अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. ताज्या मटारच्या तुलनेत फ्रोजन मटर आरोग्याला नुकसान पोहोचू शकतात. त्यामुळं कोणत्या आजारांचा धोका असतो जाणून घेऊया. 

मटारला ताजे ठेवण्यासाठी त्यात स्टार्ज मिळवले जातात. हे स्टार्च जेवणाची चव वाढवण्यासाठीही महत्त्वाचे काम करतात. जेव्हा आपण फ्रोजन मटारचे सेवन करतो तेव्हा हे स्टार्ज शरीरात ग्लुकोजमध्ये परिवर्तित होते. ग्लुकोज रक्तात मिसळून ब्लड शुगर वाढते. त्यामुळं मधुमेह होण्याचा धोका असतो. 

फ्रोजन किंवा पॅक्ड मटरमध्ये ट्रान्स फॅट असते. ट्रान्स फॅट एलडीएल कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढवते आणि एचडीएल कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करते. त्यामुळं हृदय रोगाचा धोका वाढतो. ट्रान्स फॅट नसांना देखील नुकसान पोहोचवते त्यामुळं हृदयविकाराचा धोका वाढतो. 

फ्रोजन मटरमध्ये मटारच्या तुलनेत पोषकतत्वे कमी असतात. कारण मटार एकत्र केल्यानंतर त्याला लगेचच डिप फ्रिज केले जाते. त्यामुळं त्यातील पोषक तत्वे नष्टे येतात. दीर्घकाळासाठी फ्रीजमध्ये ठेवल्याने पोषक तत्वांचे नुकसान होतात. 

फ्रोजन वाटाणे वापरण्यास सोपे असले, तरी ते ताज्या वाटाण्यांपेक्षा कमी चवदार असण्यासोबतच ते शरीरासाठी हानिकारक देखील असतात. फ्रोजन मटारमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असू शकते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link