PHOTO: भारताच्या राष्ट्रध्वजावर `अशोक चक्र` कुठून आलं? त्यात किती आऱ्या असतात? प्रत्येक आरीचा अर्थ काय?

Swapnil Ghangale Wed, 14 Aug 2024-10:42 am,

सम्राट अशोकाच्या काळातील अनेक शिलालेखांवर एक चाकासारखी आकृती आढळून येते. याच आकृतीला अशोकचक्र असं नाव देण्यात आलं.

अशोकाच्या काळातील या अशोकचक्राचा भारताच्या राष्ट्रध्वजावर समावेश करण्यात आला. मात्र या अशोकचक्रामध्ये नेमक्या आऱ्या आहेत तुम्हाला ठाऊक आहे का?

तर या अशोकचक्रामध्ये एकूण 24 आऱ्या आहेत. बरं या प्रत्येक आरीचा एक अर्थ आहे. प्रत्येक आरी ही एक गुणधर्म दर्शवते. याचसंदर्भात आजच्या म्हणजेच 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जाणून घेऊयात...

पहिली आरी संयम दर्शवते. संयमित जीवन जण्याची प्रेरणामध्ये मिळते, असं सांगितलं जातं. अशोकचक्रातील दुसरी आरी आरोग्य दर्शवते. निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा यामधून मिळते.

 

तिसरी आरी शांततेचा संदेश देते. देशातील शांतता आणि निर्धारित करण्यात आलेली व्यवस्था निरंतरपणे काम करण्यासंदर्भातील संकेत यामधून दिला जातो. चौथी आरी ही त्यागाचं प्रतिक आहे. देश आणि समाजाप्रती आपली त्यागाची भावना कायम असली पाहिजे असं यामधून निर्देशित केलं जातं.

5 वी आरी ही शालिनतेचं प्रतिक असते. तर 6 वी आरी ही सेवाभाव दर्शवते. देश आणि समाजाची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे असं सहाव्या आरीमधून दर्शवलं जातं.

7 वी आरी ही क्षमेचं प्रतिक असते. मानव आणि प्राण्यांप्रती आपण क्षमा करण्याचा भाव अंतरी बाळगला पाहिजे असं यामधून दर्शवलं जातं. 8 वी आरी ही प्रेमाचं प्रतिक असते. देश आणि समाजाबद्दल आपल्या मनात प्रेम हवं असा संदेश यातून दिला जातो.

9 वी आरी मैत्री दर्शवते. समाजामध्ये मैत्रीचा भाव जपला पाहिजे असं यातून सूचित केलं जातं. तर 10 वी आरी ही बंधुत्वाचा संदेश देते. देशात प्रेम आणि बंधुत्वाला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं यातून सांगितलं जातं. 

11 वी आरी ही संघटनेचं महत्त्व सांगते. राष्ट्रीय एकता आणि अखंडता मजबूत करण्यासाठी संघटीत होणे आवश्यक असते असा संदेश ही आरी देते. 12 वी आरी ही समाज कल्याण आणि देश कल्याणाचं प्रतिक आहे. देश, सामाजासाठी कल्याणकारी कामं करावीत असं यातून सुचित केलं जातं.

13 वी आरी ही समृद्धीचं प्रतिक असून समाज आणि देशाच्या समृद्धीमध्ये आपलंही योगदान असावं असे प्रयत्न प्रत्येकाने करावेत, असा संदेश यामधून दिला जातो. तर 14 वी आरी ही उद्योगांना प्रत्साहन देण्याचा किंवा औद्योगिक प्रगतीमध्ये हातभार लावण्याचा संदेश देते.

15 वी आरी ही देशाच्या सुरक्षेसाठी कायम तयार राहिलं पाहिजे असा संदेश नागरिकांना देते. तर 16 वी आरी खासगी आयुष्यामध्ये नियमांचं पालन करण्याचा संदेश देते.

17 वी आरी समतेचा तर अठरावी आरी अर्थ म्हणजेच संपत्तीसंदर्भातील संदेश देते. समतेने सर्वांना वागणारा समाज घडवण्याची प्रेरणा सतरावी आरी देते. तर 18 व्या आरीचा अर्थ आपल्याकडी संपत्ती योग्य कामासाठी वापरावी असा होतो.

19 व्या आरीचा अर्थ देशातील नीतिवर लोकांची निष्ठा असली पाहिजे असा होतो. तर 20 वी आरी ही देशातील सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असं सांगते.

21 वी आरी सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देते. सहकार्याने एकमेकांसोबत राहिलं पाहिजे असा संदेश यातून दिला जातो. 22 वी आरी ही कर्तव्य भावनेला समर्पित आहे. आपल्या कर्तव्यांचं पालन ईमानदारीने करावं असं यातून अधोरेखित केलं जातं.

शेवटच्या 2 आऱ्यांपैकी 23 वी आरी ही अधिकारांबद्दल सांगते. आपल्या अधिकारांचा चुकीच्या पद्धतीने वापर करु नये असा संदेश यामधून दिला जातो. तर 24 वी म्हणजेच शेवटची आरी ही बुद्धीमत्ता दर्शवते. देशाला समृद्ध करण्यासाठी स्वत:चा बौद्धिक विकास करण्याची प्रेरणा यातून दिली जाते.

आपल्या राष्ट्रध्वजावरील अशोकचक्राबद्दल तुम्हाला ही माहिती होती का? ही माहिती तुमच्या ओळखीतल्या लोकांबरोबर नक्की शेअर करा.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link