भारतानं हेरली चीनची चाल; रक्त गोठवणाऱ्या बर्फाळ शक्सगाम खोऱ्यात नेमकं काय सुरु होतं?

Fri, 03 May 2024-11:29 am,

India China Shaksgam Valley Importance: पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या शक्सगाम खोरं या भागात सध्या चीनकडून पक्क्या रस्त्याचं बांधकाम सुरु करण्यात आलं आहे. 

सॅटेलाईटनं टीपलेल्या फोटोंमुळं ही बाब समोर आली असून, त्यात चीन इथं सिमेंटचा पक्का रस्ता बांधत असल्याचं लक्षात येत आहे. 

जगातील सर्वाधिक उंचीवर असणारी युद्धभूमी अशी ओळख असणाऱ्या सियाचीनपासून हा प्रदेश बराच जवळ असल्याचं सांगितलं जातं. 

दरम्यान शक्सगाम खोऱ्यामध्ये चीनकडून करण्यात येणाऱ्या या बांधकामाचा भारताकडून निषेध करण्यात येत आहे. हा आमच्याच देशाचा भाग असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून चीनला खडसावण्यात आलं आहे. 

 

1963 मध्ये झालेल्या पाकिस्तान- चीनमधील कथित कराराला आपण कधीच स्वीकारलं नसून, शक्सगाम खोऱ्याला आम्ही कायमच आमच्या देशाचाच एक भाग म्हणत आलो आहोत असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. 

परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार त्या कथित कराराच्या माध्यमातून पाकिस्ताननं बेकायदेशीर प्रकारे शक्सगाम खोऱ्याचा भाग चीनला सोपवण्याचा प्रयत्न केला होता. 

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार शक्सगाम खोऱ्याच्या परिसराचं संरक्षण करण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचा हक्क आपल्याला असून, पूर्व लडाख- चीनमधील तणावामध्ये आता शक्सगामवरही शेजारी राष्ट्राची वक्रदृष्टी असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

सध्याच्या घडीला चीनच्या आक्षेपार्ह पावलामुळं जागतिक स्तरावर शक्सगामचं खोरं चर्चेचा विषय ठरत असून, या भागाचे फोटोही सोळल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link