Mithali Raj : लग्न झालेल्यांना जेव्हा पण बघते... मिताली राजने सांगितलं लग्न न करण्याचे कारण

Mon, 20 Mar 2023-6:11 pm,

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज ही भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तिला 'महिला क्रिकेटचा सचिन तेंडुलकर' देखील म्हटले जाते. 

2018 मध्ये मिताली राजने मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत अजून लग्न का केले नाही याचा मोठा खुलासा केला होता.

भारताची माजी स्टार फलंदाज मिताली राजचे क्रिकेट हे पहिले प्रेम नव्हते. वडिलांच्या सांगण्यावरून मिताली राज क्रिकेटर बनली. मितालीचा भाऊ आणि वडीलही माजी क्रिकेटपटू राहिले आहेत.

मितालीला नृत्याची आवड होती. तिला लहानपणापासूनच नृत्यांगना व्हायचं होतं. तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले आहे. मात्र वडिलांच्या इच्छेमुळे मितालीने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र तिने पुढे जाऊन विक्रम रचत सर्वांना आश्चर्यचकित केले.

 

3 डिसेंबर 1982 रोजी जोधपूर, राजस्थान येथे जन्मलेल्या मिताली राजने अद्याप लग्न केलेले नाही. इतकं वय असूनही मितालीचे लग्न न होण्याचं कारणही खूप खास आहे. 

 

मी तरुण असतानाच सुरुवातीलाच लग्नाचा विचार माझ्या डोक्यातून काढून टाकला होता. मी जेव्हा पण विवाहित लोकांना पाहते तेव्हा आपण सिंगलच बरे आहोत असे वाटते, असे स्पष्टीकरण मितालीने दिलं होतं.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link