Virat Kohli: 1 शतक अन् 5 विक्रम! विराटच आयपीएलचा King, रोहितलाही टाकलं मागे

Swapnil Ghangale Fri, 19 May 2023-9:49 am,

विराटने झळकावलेलं शतक हे त्याने आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना झळकावलेलं दुसरं शकत ठरलं. तर दुसऱ्या डावात केलेलं विराटचं हे आयपीएलमधील दुसरं शतक आहे. यापूर्वी 2016 च्या पर्वातील 35 व्या सामन्यात 58 चेंडूंमध्ये 108 धावांची खेळी केली होती. पुणे सुपर जायंट्सविरुद्ध त्याने बंगळुरुमध्ये ही खेळी केलेली.

धावांचा पाठलाग करताना दोन शतकं साजरा करणारा विराट हा केवळ पहिला खेळाडू ठरला आहे. धावांचा पाठलाग करताना आयपीएलमध्ये देवदत्त पलिकड, पॉल वथट्टी, विरेंद्र सेहवाग, शिखर धवन आणि अंबती रायडू यांनी धावांचा पाठलाग करताना शतकं ठोकली आहेत.

आरसीबी म्हणजे विराट आणि विराट म्हणजे आरसीबी हे जणून आयपीएलमधील समीकरण झालं आहे. विराट हा 2008 पासून बंगळुरु संघाकडूनच खेळतोय. विराटने 2016 मध्ये एकाच पर्वात 4 शतकं झळकावली होती. त्यानंतर त्याने 2019 च्या पर्वात एक शतक झळकावलं. 

गुरुवारी विराटने झळकावलेलं शतकं हे आयपीएलमधील त्याचं 6 वं शतकं ठरलं. कोणत्याही एकाच संघासाठी खेळताना कोणत्याही खेळाडूने झळकावलेली ही आयपीएलमधील सर्वाधिक शतकं आहेत. विराटच्या आधी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने आरसीबीसाठी 5 शतकं झळकावली आहेत.

विराटने हैदराबादच्या मैदानावर हैदराबामध्ये झळकावलेलं शतक हे विराटसाठी आणखीन एका कारणामुळे खास ठरलं. हे विराटचं टी-20 मधील सातवं शतक ठरलं आहे. 

क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये विराट इतकी शतकं कोणताही भारतीय क्रिकेटपटू झळकावू शकलेला नाही. विराटने आयपीएलमध्ये 6 आणि 2022 च्या आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध एक अशी एकूण 7 टी-20 शतकं झळकावली आहेत. 

विराटने या शतकासहीत रोहित शर्मा आणि के. एल. राहुलला एकूण टी-20 शतकांच्याबाबतीत मागे टाकलं आहे. या दोघांच्या नावावर टी-20 मध्ये प्रत्येकी 6 शतकं आहेत.

विराटने या सामन्यामधील शतकाच्या जोरावर 6 वेगवेगळ्या आयपीएलच्या पर्वांमध्ये 500 हून अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. विराट हा असा विक्रम करणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरलं आहे. यंदाच्या पर्वात हा विक्रम दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपल्या नावावर केला होता. 

विराट आणि फॅप ड्युप्लेसिसने यंदाच्या पर्वात 800 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. असं आयपीएलमध्ये केवळ दुसऱ्यांदा घडलं आहे.

यापूर्वी 2016 मध्ये विराट आणि ए. बी. डिव्हिलियर्सने एकत्र फलंदाजी करताना 800 धावांचा टप्पा ओलांडला होता.

विराटने 9 व्या ओव्हरमध्ये लगावलेला षटकार हा त्याचा सर्वात मोठा षटकार ठरला आहे. विराटने 103 मीटरचा षटकार लगावला. विराट हा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या आयपीएल खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानी आहे.

विराटहून अधिक षटकार एम. एस. धोनी (239), ए. बी. डिव्हिलियर्स (251), रोहित शर्मा (255) आणि ख्रिस गेल (357) या खेळाडूंनी लगावले आहेत. (सर्व फोटो ट्वीटरवरुन साभार)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link