भन्नाट! सूर्याच्या जवळ जात Aditya L1 नं टिपली अद्भूत दृश्य

Tue, 11 Jun 2024-10:49 am,

ISRO Aditya L1 Spacecraft Mission : सूर्याच्या हालचाली आणि इतर गोष्टींसंदर्भातील निरीक्षणाच्या हेतूनं अंतराळात पाठवण्यात आलेल्या आदित्य एल1 यानानं भारावणारी छाया टीपली आहे. 

इस्रोनं नुकत्याच प्रदर्शित केलेल्या छायाचित्रांमध्ये सौरवादळाची विविध रुपं स्पष्टपणे पाहता येत आहेत. 

अनेक सेन्सर असणाऱ्या लेन्सच्या माध्यमातून आदित्य एल1 नं सूर्याच्या या छाया टीपल्या. 

 

इस्रोच्या माहितीनुसार पृथ्वीपासून दीड कोटी किलोमीटर अंतरावर आदित्य एल1 लॅग्रान्ज पॉईंट इथं स्थिरावलं असून, त्याच ठिकाणहून ते सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. 

 

याच यानाच्या माध्यमातून मे महिन्यात टीपण्याल आलेले सौरवादळाचे फोटो शेअर करत त्या फोटोंसंदर्भातील माहिती इस्रोनं दिली आहे. 

इस्रोच्या माहितीनुसार सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंक टेलिस्कोपच्या माध्यमातून व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफचा वापर करत सूर्यावरील ही दृश्य टीपण्यात आली. 

 

आदित्य एल1 नं टीपलेल्या या फोटोंमध्ये सूर्यावरील सनस्पॉट दिसत असून सूर्यावर चुंबकीय बदलांमुळं सौर वादळं आल्याचं सांगत या वादळांचा पृथ्वीवरही परिणाम दिसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

8 ते 15 मे दरम्यानच्या काळात सूर्यावर सौरवादळं आल्याचं सांगत 11 मे रोजी आलेलं वादळ मोठं असल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link