भारतातील अद्भुत मंदिर, 12 व्या शतकात स्थापना;14 वर्षे सुरु होतं काम! ध्वज फडकतो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने

Pravin Dabholkar Sun, 07 Jul 2024-9:11 am,

Jagannath Puri Temple: ओडिशामधील पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुल्क पक्षाच्या द्वितीय तिथीत येथे यात्रा सुरु होते. ही यात्रा 10 दिवस चालते. या मंदिराविषयी काही रोचक तथ्य जाणून घेऊया 

ओडिशामध्ये असलेले जगन्नाथ मंदिर प्राचीन काळापासून पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाते. पुरुषोत्तम नीलमाधवच्या रूपात भगवान विष्णूंनी येथे अवतार घेतला होता, अशी अख्यायिका आहे. त्यामुळेच या मंदिराचा चार धाम तीर्थक्षेत्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

भगवान जगन्नाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि जगन्नाथ पुरी मंदिराच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी लाखो लोक दरवर्षी ओडिशाला भेट देतात. पण हे मंदिर कसे बांधले गेले? याचा इतिहास काय? याबद्दल जाणून घेऊया. 

हे मंदिर 12व्या शतकात गंगा वंशातील प्रसिद्ध राजा अनंतवर्मन चोडगंगा याने बांधले होते. तथापि, जगभरातील अनेक हिंदू मंदिरांप्रमाणे, बिगर हिंदूंना भगवान जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नसते. राजाला एकदा स्वप्नात भगवान जगन्नाथाचे दर्शन झाले. गुहा शोधून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे संकेत राजाला स्वप्नात मिळाले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. 

जगन्नाथ पुरी मंदिर बांधण्यासाठी तब्बल 14 वर्षे लागली. तथापि, मंदिरात स्थापित बलभद्र जगन्नाथ आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्तींचीही 1863, 1939, 1950, 1966 आणि 1977 मध्ये पुनर्बांधणी करण्यात आली.

हे मंदिर भगवान विष्णूचा अवतार श्री कृष्णाला समर्पित असल्याचे सांगितले जाते. भगवान जगन्नाथ आपला भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासह या मंदिरात विराजमान आहेत. मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज नेहमी वाऱ्यावर फडकतो.

या मंदिराची रचना सुमारे 400,000 चौरस फूट पसरलेली आहे. त्याच्या शिखरावर चक्र आणि ध्वजही बसवण्यात आला आहे. या दोन्ही गोष्टींना विशेष महत्त्व आहे. सुदर्शन चक्र आणि लाल ध्वज मंदिराच्या आत भगवान जगन्नाथ यांच्या उपस्थितीचे प्रतीक आहे. अष्टधातुपासून बनलेल्या या चक्राला नीलचक्र असेही म्हणतात. 

मंदिरात भोग मंदिर, नाथ मंदिर, जगमोहन मंदिर आणि मंदिर अशी चार कक्ष आहेत. इथे गेल्यावर तुम्हाला मंदिर परिसर भिंतीने वेढलेला दिसेल. मंदिराच्या प्रत्येक बाजूला दरवाजे आहेत. 

मंदिराच्या शिखरावर असलेले सुदर्शन चक्र तुम्हाला कुठूनही पाहता येऊ शकते. यावरुन कोणताही पक्षी किंवा विमान उडू शकत नाही. या मंदिरात भाविकांसाठी बनवलेला प्रसाद कधीच कमी पडत नाही, असे म्हणतात. जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. 

जगन्नाथ मंदिरात जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. जगन्नाथ पुरी मंदिरात तुम्ही पहाटे 5 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 पर्यंत दर्शन घेऊ शकता. तुम्ही कधीही दर्शनासाठी जाऊ शकता.

मंदिरात जाण्यासाठी तुम्ही ट्रेन, रस्ता, फ्लाइट घेऊ शकता. पण या सर्वात रेल्वेचा प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरेल. कारण पुरी रेल्वे स्टेशन भारताच्या सर्व भागांशी चांगले जोडलेले आहे. इथून थेट टॅक्सीने मंदिरात जाता येते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link