चारही मुलांसोबत बोनी कपूर यांचा व्हेकेशन प्लॅन...

Sat, 28 Apr 2018-3:00 pm,

श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी कपूर यांची चारही मुले मिळून मिसळून राहताना दिसत आहेत आणि बोनी कपूरही त्याच प्रयत्नात आहेत. पूर्वी कायम श्रीदेवीसोबत दिसणाऱ्या तिच्या दोन्ही मुली आता सावत्र भांवडं अर्जुन कपूर आणि अंशुलासोबत दिसतात.

 

शुक्रवारी बोनी कपूर यांना आपल्या मुलींसह मुंबईतील एका रेस्टॉरन्टमध्ये स्पॉट करण्यात आले. त्यावेळी जान्हवी, खुशी आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुलाही होती.

 

रेस्टॉरन्टमधून बाहेर पडताना जान्हवी आणि अंशुला.

 

यावेळी जान्हवीने सफेद टीशर्ट आणि ब्लू ट्राऊजर घातली होती. तर खुशी ब्लॅक आऊटफीटमध्ये एकदम स्टायलिश दिसत होती.

 

तर अंशुलाने नेव्ही ब्लू रंगाचा टीशर्ट आणइ डेनिम घातली होती. 

 

एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी सांगितले की, २ आठवड्यांसाठी ते आपल्या मुलांसह लंडनला फिरायला जाणार आहेत. अर्जुन कपूर लंडनमध्ये त्याच्या नमस्‍ते लंडन सिनेमाचे शूटिंग करत आहे आणि त्याच दरम्यान बोनी कपूर आपल्या मुलींसह तिथे जाणार आहेत. (सर्व फोटो सौजन्य : yogen Shah)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link