कल्याणवरून नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत? पाहा नव्या मेट्रो मार्गामुळं तुम्हालाही होणार फायदा

Tue, 05 Mar 2024-9:15 am,

Kalyan To Taloja Metro Route : पुढील काही वर्षांमध्ये मेट्रोचा आणखी एक मार्ग नवी मुंबईला कल्याणशी जोडणार आहे. उपलब्ध माहितीनुसार मेट्रो 12 च्या मार्गिकेचं हे काम 2027 अखेर पूर्ण होण्याचे संकेत आहेत. 

मेट्रोचा हा नवा मार्ग पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाल्यास अंधेरी-मीरा-भाईंदर-वडाळा-घाटकोपर-ठाणे-कल्याण-नवी मुंबई असा एकंदर मेट्रोचा वर्तुळाकार मार्ग शहरात सुरू होणार आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे मेट्रो 12 ला मेट्रो 3,4,5 सह अन्य काही मेट्रो मार्गांशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहर मेट्रोने सहजगत्या जोडलं जाईल.

 

या नव्या मार्गासाठीच्या मेट्रो मार्गाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.  ज्यानंतर ‘एमएमआरडीए’ने प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. 

मेट्रोचा हा नवा मार्ग सेवेत दाखल झाल्यास दर दिवशी अंदाजे अडीच लाख प्रवासी इथून ये-जा करतील अशी अपेक्षा एमएमआरडीएनं व्यक्त केली आहे. 

दरम्यान, शहरातील 337 किमी अंतराच्या मेट्रो प्रकल्पातील कल्याण-तळोजा मेट्रो 12 हा मार्ग 20.75 किमी लांबीचा आहे. 

कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या 19 मेट्रो स्थानकांचा यात समावेश आहे.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link