चिवडा नरम होतो? या 3 टिप्स वापरा शेवटपर्यंत राहील कुरकुरीत

Mansi kshirsagar Mon, 30 Oct 2023-5:48 pm,

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, खरंतर अनेक जणांकडे  दिवाळीचा उत्साह आधीपासूनच जाणवायला लागतो. मग ती घराची साफसफाई, दिवाळीची खरेदी असो किंवा मग फाराळाचं सामान यापासूनच अनेकांची दिवाळी सुरू होते. 

 दिवाळी 15 दिवसांवर आली असताना गृहिणींची फराळ बनवण्याची लगबग सुरू होते. अनेक ठिकाणी हल्ली विकतचा फराळ मिळतो मात्र घरच्या फराळासारखी तशी चव बाजारातल्या फराळाला क्वचितच येते. 

15 दिवस आधी फराळ बनावल्यानंतर कधी कधी त्यातील चिवडा नरम पडतो. अशावेळी ऐन दिवाळीत फजिती होती. चिवडा दीर्घकाळ कुरकुरीत राहावा, यासाठी या काही टिप्स वापरून पाहाच 

 

पातळ पोह्यांचा चिवडा बनवत असाल तर जेव्हा आपण जेव्हा पोहे भाजून घेत असतो, तेव्हा चिमूटभर मीठ टाका. यामुळे पोह्यांचा आकार लहान होत नाही आणि पोहे जास्त वेळ कुरकुरीत राहतात.

 

चिवड्यात आपण जे जे साहित्य टाकतो, त्यात कढीपत्ता किंवा मिरची हे दोन घटक ओलसर असतात. मिरची आणि कढीपत्ता खुसखुशीत होईपर्यंत तळावा. जेणेकरून चिवड्यात त्याचा ओलसरपणा जाणार नाही.

चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावर नंतरच तो हवाबंद डब्यात भरून ठेवावा. तो थोडा गरम असताना डब्यात भरून ठेवल्यास त्याचा कुरकुरीतपणा कमी होतो.

या टिप्स वापरुन चिवडा केल्यास अगदी महिनाभर हा चिवडी मस्त कुरकुरीत राहतो व खायलाही छान लागतो 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link