`कुछ कुछ होता है`तील `अंजली`चं 26 वर्षात क्यूट ते हॉट ट्रान्स्फॉर्मेशन! इतकी बदलली की आता ओळखणं कठीण

Pravin Dabholkar Fri, 12 Jul 2024-9:29 am,

Sana Saeed: करण जोहरचा सिनेमा 'कुछ कुछ होता है' पाहिला नसेल असे फार कमीजणच असतील.

1988 मध्ये आलेल्या या सिनेमाने सर्व रेकॉर्ड्स तोडले होते. शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यातील ट्रायंगल लव्हस्टोरी यात दाखवण्यात आली होती.

सिनेमातील 3 स्टार्सचे काम लोकांना खूपच आवडले होते. पण यांच्यासोबतच छोट्या अंजलीच्या भूमिकेने सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं. 

सिनेमातील 'अंजली' वर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. सिनेमाला 26 वर्षे झाली असली तरी 'अंजली'आणि तिचा क्यूटनेस कोणी विसरु शकले नाही.  

'अंजली' म्हणजे सना सईद ता मोठी झाली. तुम्ही आता तिला पाहिलंत तर ती हिचं का हे ओळखणं तुम्हालाही कठीण जाईल. 

सिनेमात खूप निरागस आणि क्यूट दिसणारी अंजली आता खूपच हॉट आणि आणखी सुंदर दिसतेय. 

सना सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो ती नेहमी शेअर करत असते. 

सना आता 33 वर्षांची आहे पण जितकी प्रसिद्धी तिला मिळायला हवी होती तितकी मिळालेली दिसत नाही. 

सना 2 सिनेमा आणि काही डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. यानंतर तिला मनासारखं यश मिळालं नाही. 

सना सईदने आपला बॉयफ्रेण्ड साबा वॉर्नसोबत साखरपुडा केला होता. ती एक हॉलीवूड साऊंड इंजिनीअर असून लॉस एंजिलिसमध्ये राहते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link