Sanjay Dutt च्या भाऊजीवर एकेकाळी मुली व्हायच्या फिदा, पण; `ती` चूक पडली महागात आणि...

Tue, 21 Mar 2023-8:18 pm,

कुमार गौरवनं 1981 साली आलेल्या लव्ह स्टोरी या चित्रपटातून डेब्यू केलं होतं. त्यानंतर तेरी कसम, हम हैं लाजवाब, दिल तुझको दिया, आज, गूंज आणि प्रतिज्ञाबध अशा चित्रपटांतून काम केली होती. 

कुमार गौरव हे आता बिझनेस करतात आणि त्यांनी संजय दत्त यांच्या बहिणीशी नम्रता दत्तशी लग्न केले. 

त्यांच्यासोबत अनेक अभिनेत्रींनीही काम करण्याचे नाकारले. त्यामुळे त्यांच्याबद्दल इतरांचे मतंही बदलायला लागले होते. त्यांच्यावर एकेकाळी अनेक हिरोईन्स आणि महिला फॅन्स फिदा असायच्या. 

त्यांच्या या बदलत्या स्वभावामुळे सगळेच आश्चर्यचकित होऊ लागले होते. त्यांना अनेक चित्रपटांतून चांगले यश मिळाले परंतु त्यामुळे त्यांच्या आविर्भाव प्रचंड बदल झाला आणि डायरेक्टर व प्रोड्यूसर त्यांच्यावर नाराज झाले. 

त्यांच्यासह काम करणाऱ्या अभिनेत्री मंदाकिनीही या तेव्हा नव्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत काम करायलाही त्यांनी नकारघंटा लावली होती. त्यांचे म्हणणे होते की ते लोकप्रिय अभिनेत्रींसोबतच काम करणार. 

कुमार गौरव हे 80 च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेते होते. त्यांचे चित्रपट तेव्हा प्रचंड गाजले होते. परंतु त्यांच्या एका चुकीमध्ये त्यांचे संपुर्ण करिअरचं बरबाद झाले. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link