महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अष्टविनायकप्रमाणे आहेत `हे` 11 वारीचे मारुती

Tue, 23 Apr 2024-2:15 pm,

समर्थ रामदास स्वामी यांनी तरुणांसमोर शक्तीचं प्रतिक म्हणून मारुतीची स्थापना केली असं म्हटलं जातं. सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी 11 मारुतीचे मंदिर स्थापन केले. 

कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव हे मंदिर असून बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती नावाने ओळखला जातो. हा सर्वात छोटा मारुती आहे. 

 

सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज गावात चिपळूणकडे जाणारा फाटाजवळ तुम्हाला चाफळचा वीर मारुतीचं मंदिर दिसेल. राममंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती इथे तुम्हाला पाहिला मिळेल. 

 

चाफळच्याच मंदिरापासून 100 मीटरवर गेल्यास तुम्हाला भीमरूपी मारुतीचं दर्शन होईल. 

 

शिंगणवाडीची टेकडी वसलेले या मारुतीला खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती या नावाने ओळखलं जातं. 

चाफळपासून केवळ 3 कि.मी. अंतरावर एका दगडाला समर्थांनी मारुतीचे रूप दिलं. गावकऱ्यांनी आग्रह केल्यामुळे समर्थांनी याच धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून मंदिर स्थापन केलं. 

 उंब्रज मध्ये तीन मारुतीचे मंदिर असून उंब्रजचा मठातील मारुती अतिशय प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या स्थापनेनंतर रामदास स्वामींनी कीर्तन केलं होतं असं म्हणतात.

 

उंब्रजपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या मसूर मारुती मंदिरातील हनुमान पूर्वाभिमुख आहे. 11 मारुतीमध्ये या मारुतीचं रुप देखण आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळे गाव नागांसाठी प्रसिद्ध असून गावातील एस.टी. स्टँडजवळच हे मारुतीचे मंदिर आहे. 

कराड-मसूर रस्त्यावर 15 कि.मी. आणि मसूरपासून 3 कि.मी. अंतरावर शहापूर गावचा फाटाजवळ हे मारुती मंदिर आहे. या मारुतीला ‘चुन्याचा मारुती’ या नावानेही ओखळ आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बहे किंवा बाहे गाव 11 वारी मारुतीमधील एक मंदिर आहे. समर्थांनी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि त्याची स्थापना केली अशी आख्यायिका आहे.

 

मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड-ज्योतिबाच्या परिसरात आहे. 11 मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या मंदिराची स्थापना करण्यात आली. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link