नक्षलवादी भाग गडचिरोलीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Thu, 11 Apr 2019-1:25 pm,

संपूर्ण विदर्भात सर्वाधिक मतदान गडचिरोलीत होतं आहे. अगदी दुर्गम भागातही मतदार मतदान करत आहेत. तर याच्या उलट स्थिती वर्धा, रामटेक, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळमध्ये आहे. नागपुरात १७.५६ टक्के मतदान झालं आहे.

गडचिरोलीत मतदान प्रक्रियाच उधळण्याची धमकी नक्षल्यांनी दिली आहे. दोन ठिकाणी मतदान सुरू असताना नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोटही केले. तरीही मतदारांवर याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.

विदर्भात सात मतदार संघात मतदान सुरू आहे. मात्र नक्षलवाद्यांची धमकी झुगारून गडचिरोलीत आत्तापर्यंत सर्वाधिक मतदान झालं आहे. गडचिरोलीत तब्बल १८.०१ टक्के मतदान झालं आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link