34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..

Swapnil Ghangale Sat, 04 May 2024-10:15 am,

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेवदारी अर्ज दाखल करताना श्रीकांत शिंदेंनी सादर केलेल्या विवरणपत्रामध्ये संपत्तीसंदर्भात खुलासा केला आहे. 

 

श्रीकांत शिंदेंच्या संपत्तींमध्ये मागील पाच वर्षांमध्ये म्हणजेच 2019 पासून आजपर्यंत 13 कोटींनी वाढल्याचं कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे.

 

श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी वृषाली यांच्या नावावर स्थावर आणि जंगम अशी एकूण 14 कोटी 43 लाख 80 हजार 790 रुपये इतकी मालमत्ता आहे.

 

पाच वर्षांपूर्वी श्रीकांत शिंदेंची संपत्ता 1 कोटी 67 लाख 59 हजार 515 रुपये इतकी होती. याच संपत्तीत मागील 5 वर्षात 13 कोटींना वाढ झाली आहे.

 

श्रीकांत शिंदेंकडे 3 लाख 99 हजार 21 रुपये रोख रक्कम असून पत्नी वृषाली यांच्याकडे 1 लाख 41 हजार 452 रुपये कॅश असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

श्रीकांत शिंदेंकडील जंगम मालमत्तेचं मूल्य हे 4 कोटी 79 लाख 64 हजार 927 रुपये इतकं आहे. तर त्यांच्या पत्नीकडील जंगम मालमत्ता ही 3 कोटी 35 लाख 43 हजार 884 रुपये इतक्या मुल्याची आहे.

 

श्रीकांत शिंदेंकडे 2 कोटी 34 लाख 54 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर पत्नी वृषालीकडे 3 कोटी 94 लाख 17 हजार 978 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

 

श्रीकांत शिंदेंनी त्यांच्यावर 1 कोटी 77 लाख 36 हजार 550 रुपये कर्ज असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीवर त्यांच्यापेक्षा जास्त कर्ज आहे. वृषाली श्रीकांत शिंदेंवर 4 कोटी 85 लाख 83 हजार 893 रुपये कर्ज असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे कर्ज वृषाली यांच्याकडील स्थावर मालमत्तेपेक्षाही जास्त आहे.

श्रीकांत शिंदेंकडे 11 लाख 34 हजार 529 रुपयांचे सोनं, 4 लाख 97 हजार 137 रुपयांची हिऱ्याची अंगठी, 1 लाख 10 हजार 500 रुपयांची दोन घड्याळं आहेत.

 

वृषाली शिंदेंकडे 22 लाख 82 हजार 725 रुपयांचं सोनं, 7 लाख 56 हजार रुपयांची हिऱ्याची अंगठी, 1 लाख 63 हजार 872 रुपयांचं चांदीचे दागिने आणि 3 लाख 44 हजार 17 रुपयांची 2 घड्याळं आहेत. श्रीकांत आणि वृषाली यांच्याकडे एकूण 34 लाख 16 हजारांहून अधिक किंमतीचं सोनं आहे.

श्रीकांत शिंदे आणि वृषाली शिंदेंच्या नावावर एकही वाहन नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

श्रीकांत शिंदे यांच्या नावावर सातारा जिल्ह्यात दर गावामध्ये शेतजमीन आहे. तर पत्नी वृषाली शिंदेंच्या नावावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हुरमाळा गावात शेतजमीन आहे.

 

श्रीकांत शिंदेंच्या पत्नीच्या नावावर ठाण्यात 3 ठिकाणी फ्लॅट्स आहेत. पाचपाखाडीमधील देव अशोका इमारतीमध्ये एक फ्लॅट असून दुसरा कळवा येथील इंद्रायणी को ऑप्रेटीव्ह सोसायटीमध्ये आहे. तसेच ठाण्यातील रहेजा गार्डन येथे अॅस्कोना अमाल्फी येथेही एक घर आहे.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link