`या` राजाच्या होत्या 350 राण्या आणि 88 मुलं, लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी खायचा चिमणीच्या मेंदूपासून बनवलेले औषध

Thu, 30 May 2024-1:07 pm,

असाच एक राजा होता पटियाला राज्यातील महाराजा भूपिंदर सिंग जो त्याच्या रंगीबेरंगी स्वभावाने जगभरात प्रसिद्ध होता. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी तो राजा झाला. 18 वर्षांचा झाल्यानंतर त्यांनी राज्याच पदभार स्विकारला आणि त्याने 38 वर्षे पटियालावर राज्य केलंय. त्याच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील. 

 

दिवाण जरमनी दास यांनी त्यांच्या 'महाराजा' या पुस्तकात महाराजा भूपिंदर सिंग यांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. या पुस्तकानुसार या राजाने लीला भवन किंवा उत्सव करणाऱ्यांसाठी महाल बांधलं होतं. या महालात एक नियम होता त्यानुसार विवस्त्र इथे लोकांना प्रवेश असायचा. पटियाला शहरातील भूपेंद्रनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बहरदरी बागेजवळ हा महाल बांधला आहे. 

 

या महालात एक अशी खोलील आहे जिला प्रेम मंदिर असं म्हटलं जातं. ही खोली महाराजांसाठी खास असून तिथे दुसऱ्या लोकांनाही तिथे जाण्याची परवानगी नव्हती. या खोलीत राजाच्या सुखसोयींची पूर्ण व्यवस्था असायची. त्याच्या वाड्याच्या एक स्विमिंग पूल होता ज्यामध्ये एकाच वेळी सुमारे 150 लोकांच्या आंघोळ करु शकायचे. याठिकाणी राजा अनेक पार्ट्या करायाचे. असं म्हणतात जेव्हा राजा या स्विमिंग पूलला आंघोळीला जायचा तेव्हा हरमच्या मुलींना नग्नावस्थेत उभं केलं जायचं.

इतिहासकारांच्या मते, महाराजा भूपिंदर सिंग यांच्याकडे एकूण 365 राण्या होत्या. ज्यांच्यासाठी पटियालामध्ये भव्य राजवाडे बांधण्यात आले होते. या महालांमध्ये राण्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची टीम नेहमी हजर राहायची. या पुस्तकानुसार महाराजांना त्यांच्या 10 पत्नींपासून 83 मुलं होती, त्यापैकी फक्त 53 मुलं जिवंत राहिली. 

महाराजांच्या महालात दररोज 365 कंदील पेटवले जात होते. या कंदिलाच वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर 365 राण्यांचे नाव लिहिलं होते. असं म्हणतात राजा सकाळी सगळ्यात पहिले विझलेल्या कंदिलावरील नाव वाचायचा आणि त्या राणीसोबत तो रात्र काढायचा. 

 

भूपेंद्र सिंह यांनी महालातील महिलांचे कपडे, मेकअप, दागिने इत्यादींसाठी तज्ज्ञ लोकांची नेमणूक केली होती. हरममधील महिलांना सतत आकर्षक ठेवण्यासाठी ते कपडे आणि दागिने डिझाइन करायचे. महाराजांना आवडेल असा मेकअपवर भर दिला जायचा. एवढंच नाही तर महिलांच्या शरीरात त्यांच्या इच्छेनुसार बदल करण्यासाठी फ्रेंच, इंग्लिश आणि भारतीय प्लास्टिक सर्जनचीही नेमणूक करण्यात आली होती. यासाठी एक प्रयोगशाळाही उघडण्यात आली होती. 

महाराजांच्या खोलीत कामुक कलाकृती बनवल्या होत्या. या कलाकृती प्राचीन मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. त्या कलाकृतींमध्ये चित्रित केलेल्या प्रेम आणि लैंगिक जीवनासाठी महाराजांना प्रेरणा मिळायची असं या पुस्तकात सांगण्यात आलंय. विविध आसनांचा सराव करण्यासाठी त्याने आपल्या खोलीच्या एका कोपऱ्यात रेशमी तारांनी बनवलेला झुलाही टांगला होता असं म्हणतात. 

शारिरीकदृष्ट्या मजबूत असूनही महाराज सर भूपेंद्र सिंह विविध प्रकारची कामोत्तेजक औषधे घ्यायचे असं या पुस्कात उल्लेख करण्यात आलाय.  भारतीय डॉक्टर मोती, सोने, चांदी आणि लोखंड, विविध प्रकारची औषधे तयार करायचे. एकेकदा बारीक चिरलेली गाजर आणि चिमणीचा मेंदू मिसळून त्यांच्यासाठी औषध तयार करण्यात आलं होतं. 

त्याच्या आहाराचा आणि थाटाचा उल्लेख डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी त्यांच्या 'फ्रीडम ॲट मिडनाईट' या पुस्तकातही करण्यात आला आहे. महाराजा एका दिवसात सुमारे 10 किलो अन्न खायचा असं म्हणतात. चहा पिताना दोन कोंबड्या खाणे हे त्यांचा नाश्ता असायचा. 

कदाचित तुम्हाला माहित नसेल की प्रसिद्ध पटियाला पेग देखील महाराजा भूपिंदर सिंग यांचीची देगणी आहे. असं म्हटलं जातं की त्याच्याकडे 44 रोल्स रॉयस कार होत्या, त्यापैकी 20 कारचा ताफा दैनंदिन कामांसाठी वापरला जायचा. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महाराजा भूपिंदर सिंग हे भारतातील पहिले व्यक्ती होते ज्यांच्याकडे स्वतःचे विमान होतं. जे त्यांनी 1910 मध्ये ब्रिटनकडून खरेदी केलं होतं. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link