'ज्याचा एकही आमदार...', सरवणकरांची 'ती' टीका जिव्हारी लागल्याने राज ठाकरेंनी नाकारली भेट?
Maharashtra Assembly Election Raj Thackeray Refuse To Meet Sada Sarvankar: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही मिनिटं उरलेले असताना सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटायला गेले असता त्यांना राज ठाकरेंनी भेट नाकारली. ही भेट नाकारण्यामागे सरवकरणांचं ते विधान कारणीभूत आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे. सरवणकर नेमकं काय म्हणालेले जाणून घ्या...
1/12
माहीम मतदारसंघामधील विधानसभेची लढत दुहेरी होणार की तिहेरी यासंदर्भातील संभ्रम उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अगदी शेवटचे काही मिनिटं बाकी असेपर्यंत कायम होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी महीममधून लढण्यासाठी केलेला उमेदवारी अर्ज कायम ठेवत आपण अमित ठाकरेंविरुद्ध लढणारच अशी घोषणा केली आणि ही निवडणूक तिहेरीच होणार हे स्पष्ट झालं.
2/12
3/12
"माझा मुलगा समाधान सरवणकर आणि महत्वाचे 4 पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. माझे वडील तुमच्याशी बोलू इच्छितात असे माझ्या मुलाने सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तुमच्याशी चर्चा करायला सांगितलं आहे, असे समाधान सरवणकर यांनी सांगितले. पण मला काही बोलायचं नाही. असे राज ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी मला भेटसुद्धा नाकारली," अशी माहिती सदा सरवरणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
4/12
5/12
6/12
7/12
8/12
9/12
"या कालावधीमध्ये प्रत्येकाची वैयक्तिक मतं असतात. ज्याचा एकही आमदार नाही त्याने मुख्यमंत्री कोण असेल हे सांगणं किती हस्यास्पद आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी त्यावर टीका करावी असं मला वाटतं नाही," असं सरवणकर म्हणाले होते. सरवणकरांची ही टीका राज यांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
10/12
11/12
राज ठाकरेंना सरवणकरांचे हेच विधान खटल्याने त्यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात त्यांना भेट नाकारली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राज ठाकरेंशी चर्चा झाली असती तर अमित ठाकरेंसाठी सरवणकरांनी माघारही घेतली असती असं सांगितलं जात आहे. त्यामुळे अमित ठाकरेंची निवडणूक अधिक सुखकरही झाली असती.
12/12