Mahila Naga Sadhu : महिला नागा साधूंची रहस्यमयी दुनिया उघड; स्वत:चच पिंडदान करतात आणि...

Fri, 09 Aug 2024-12:30 pm,

Mahila Naga Sadhu : भारतासमवेत संपूर्ण जगभरात सध्या या चक्राला गती मिळाली असून, एकट्या भारताचं सांगावं, तर इथं अध्यात्म आणि भक्ती यांचा मेळ साधणारे अनेक साधू आणि साध्वी कुंभ मेळाव्याच्या दिवसांमध्ये जगासमोर येतात. जागतिक स्तरावर ख्याती असणाऱ्या या रहस्यमयी दुनियेमध्ये कायमच सर्वांची नजर रोखणारी एक बाब म्हणजे नागा साधू. अघोरी, नागा साधू, साध्वी या आणि अशा अनेक प्रकारांविषयी कायम काही अशी रहस्य समोर येतात ज्यामुळं भुवया उंचावतात. 

 

साधुसंतांमध्येही विविध प्रकार असून, नागा साधू हा त्यापैकीच एक प्रकार. यामध्येही पुरुषांप्रमाणं महिला नागा साधूसुद्धा असतात. पण, त्यांच्यासाठीचे नियम मात्र वेगळे असतात. 

 

ज्याप्रमाणं पुरूष नागा साधू विवस्त्र असतात, त्याप्रमाणं महिला नागा साधू कधीच निर्वस्त्र राहत नाहीत. त्या कायमच केशरी किंवा करड्या रंगाच्या वस्त्रामध्ये दिसतात, या वस्त्रावर कुठेच शिवण नसते. 

 

महिला साध्वींच्या या वस्त्रांना गंती असं म्हणतात. महिला नागा साधुंना हे एकच वस्त्र परिधान करण्याची परवानगी असते. याशिवाय त्या टिळा लावून जटासुद्धा धारण करतात. 

 

नागा साध्वी होण्याआधी या महिलांना कठिण तप, आराधना करावी लागते. पर्वत, जंगल आणि गुहेपासून आव्हानात्मक ठिकाणांवर त्यांना ध्यानधारणा करावी लागते. 

महिला नागा साध्वींनाही परीक्षेसम काळाला सामोरं जावं लागतं. त्यांनी 6 ते 12 वर्षे कठोर ब्रह्मचर्याचं पालन करणं अनिवार्य असतं. त्यानंतरच या साध्वींना नागा साध्वी होण्याची अनुमती दिली जाते. 

दीक्षा घेण्यापूर्वी या महिला साधूंना केशवपन करावं लागतं. जगापासून दूर राहत ध्यानधारणा करण्यापासून त्यांना सर्व नश्वर जगाशी संपर्क तोडावा लागतो. गृहस्थाश्रमाचा त्याग करत या साध्वींना हयात असतानाच स्वत:चं पिंडदान करावं लागतं. म्हणजे आतापर्यंत जे आयुष्य व्यतीत केलं त्याचा त्याग केला असं सूचित होतं. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link