मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, साधलं अचूक टायमिंग

Tue, 06 Sep 2022-9:02 pm,

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी आज मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षावर सहकुटुंब गणरायाचं दर्शन घेतलं. 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राज ठाकरे यांच्या घरी गेले होते.

राज ठाकरे यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगा अमित ठाकरे देखील उपस्थित होते.

वर्षा बंगल्यावर भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या स्नेहभोजन होणार आहे. पण त्याच वेळ राज ठाकरे देखील वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचे स्वागत केले.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link