मुकेश अंबानींनी सिद्ध केलं Jio च भारी! फ्री नेटफ्लिक्स प्लान, 3 जीबी डेटा आणि बरंच काही..

Pravin Dabholkar Wed, 28 Aug 2024-12:24 pm,

Mukesh Ambani Jio Offer: रिलायन्स जिओ आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लान आणत असते. आता जिओच्या युजर्सना नेटफ्लिक्सचा आनंद घेता येणार आहे. यासोबत अमर्यादित डेटाचा लाभदेखील मिळेल. यासाठी जियोने दोन प्लॅन आणलेयत,त्याबद्दल जाणून घेऊया.

यापैकी एक प्लॅन 1 हजार 299 रुपयांचा आहे तर दुसरा प्लान 1 हजार 799 रुपयांचा आहे. एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला पुढच्या 84 दिवसांसाठी दोन्ही प्लॅन वापरता येणार आहेत. 

Jio चा 1299 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान तुमच्या फायद्याचा आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतील. या प्लॅनमध्ये तुम्हाला 5G नेटवर्कवर अमर्यादित डेटा आणि 4G नेटवर्कवर दररोज 2GB डेटा देखील मिळेल. हा प्लॅन 84 दिवसांसाठी वैध असेल.

जास्त डेटाची गरज असलेल्या यूजर्ससाठी 1 हजार 799 रुपयांचा नवीन प्लॅन देखील खूप चांगला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 एसएमएस मिळतील. 

तुम्ही 5G नेटवर्कवरही मोठ्या प्रमाणावर डेटा वापरू शकता. हा प्लॅन 84 दिवसांसाठी वैध असेल. म्हणजेच तुम्हाला 3 महिन्यांसाठी इतर कोणत्याही प्लॅनचा विचार तुमच्या मनात येणार नाही. 

या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचा मोफत वापर करता येईल. पण दोन्ही प्लॅनमध्ये वेगवेगळे Netflix प्लॅन असतील,याची नोंद घ्या. 1हजार 299 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचा मोबाईल पॅक मिळेल. जर तुम्ही 1 हजार 799 रुपयांचा प्लान घेतला तर तुम्हाला नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन मिळेल.

नेटफ्लिक्सचा सर्वात स्वस्त मोबाईल प्लॅन 149 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला चित्रपट, टीव्ही शो आणि गेम पाहता येतील. यात तुम्हाला कोणत्याही जाहिरातीचा व्यत्यय येणार नाही. असे असले तरी यात काही अटी आहेत. तुम्ही एकावेळी फक्त एका फोन किंवा टॅब्लेटवर नेटफ्लिक्सचा कंटेट पाहू शकता आणि व्हिडिओ गुणवत्ता थोडी कमी असेल. तुम्ही व्हिडिओ देखील डाउनलोड करू शकता परंतु हे एका वेळी एकाच फोन किंवा टॅबलेटवर शक्य आहे.

नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन जरा महाग असला तरी त्यात तुम्हाला अनेक फायदे मिळतील. तुम्ही कोणत्याही जाहिरातीशिवाय चित्रपट, टीव्ही शो आणि गेम पाहू शकता. नेटफ्लिक्स बेसिक प्लॅनमध्ये एकाच तुम्ही टीव्ही, मोबाईल फोन, टॅबलेट, कॉम्प्युटरवर कंटेट पाहू शकता. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link