Anant Ambani Radhika Merchant Engagment : अनंत-राधिकाच्या साखरपुड्याचे Unseen Photos Viral; कुटुंबाचा आणखी एक आदर्श जगासमोर...

Thu, 05 Jan 2023-12:54 pm,

राजस्थानमध्ये (Rajasthan) असणाऱ्या नाथद्वारा (nathdwara) येथील श्रीनाथजी (Srinathji temple) मंदिरात हा साखरपुडा पार पडला जिथं मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती होती. राधिका आणि अनंतला आशीर्वाद देण्यासाठी यावेळी काही पुरोहितांची उपस्थिती होती.  

सोशल मीडियावर नुकतेच या साखरपुडा सोहळ्यातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दिसणारी दृश्य सर्वांच्याच नजरा वळवत आहेत. 

 

कारण, अमाप श्रीमंती असूनही, असंख्य नोकरचाकर असूनही राधिका आणि अनंत चक्क मंदिरातील पुरोहितांना जेवण वाढताना दिसते. हे त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचे, आई- वडिलांचे संस्कारच होते याचीच प्रचिती सर्वांना आली. 

फक्त पुरोहितांना जेवण वाढणंच नव्हे, तर साखरपुड्याच्या दिवशी राधिका आणि अनंतनं एका गोशाळेलाही भेट दिली. यामध्ये गाईच्या बछड्यांना राधिकानं चारा खायला दिला. 

फिकट केशरी रंगाचा शरारा ड्रेस, जाळीदार ओढणी असा एकंदर लूक राधिकानं साखरपुड्यासाठी केला होता. तर, अनंतनं रॉयल ब्लू रंगाच्या कुर्ता, बंडी अशा लूकला पसंती दिली होती. 

राधिका आणि अनंतच्या या साखरपुड्याच्या विधीनंतर अंबानी आणि मर्चंट कुटुंबीय मुंबईत आले. 

इथं अंबानींच्या अँटिलिया या अतिभव्य निवासस्थानी एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये त्या दोघांनाही शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण कलाजगताची उपस्थिती पाहायला मिळाली होती. 

(सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया)

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link